Maharashtra cabinet : पितृपक्षानंतर नाराज आमदारांना मंत्रीमंडळात संधी मिळणार

Maharashtra cabinet : पितृपक्षानंतर नवरात्रात हा मंत्रिमंडळ विस्तार होईल तोपर्यंत वाट पहा असे एकनाथ शिंदे यांनी इच्छुक आमदारांना सांगितल्याची माहिती आहे.
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama

औरंगाबाद : शिंदे-फडणवीस सरकारचा (eknath shinde) मंत्रीमंडळ विस्तार (Maharashtra cabinet Expansion) पुन्हा कधी होईल, अशी सध्या चर्चा आहे. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री म्हणून स्थान न मिळालेल्या अनेक नाराज आमदारांची उत्सुकता राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार कधी होणार याकडे लागली आहे. मात्र यासाठी त्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी पितृपक्षानंतर निर्णय घेतला जाईल, असे संकेत त्यांच्या निवासस्थानी झालेल्या आमदारांच्या स्नेहभोजन कार्यक्रमात दिले. (Maharashtra cabinet latest news)

त्यामुळे पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेल्या नाराज आमदारांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला स्थान मिळेल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या अनेकांच्या नावावर ऐनवेळी फुली मारण्यात आली. यापैकीच एक नाव म्हणजे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट.

मंत्रिमंडळात समावेश निश्चित समजला जात असताना व तसा निरोप मिळाल्यानंतरही संजय शिरसाठ यांचे नाव ऐनवेळी कापण्यात आले. त्यामुळे ते कमालीचे नाराज होते. मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजन कार्यक्रमास देखील ते उपस्थित राहणार नाहीत अशी चर्चा होती. मात्र या चर्चेला आणखी हवा नको म्हणून त्यांनी मतदारसंघातील कार्यक्रम बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला हजेरी लावली.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदेचं मुख्यमंत्रीपद धोक्यात ? : उल्हास बापट यांचा गौप्यस्फोट

या स्नेहभोजन कार्यक्रमात काय काय राजकीय चर्चा व घडामोडी घडल्या याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या स्नेहभोजनाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी अनेक आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. अर्थात त्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचीही चर्चा झाली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मंत्री होण्यास इच्छुक असलेल्या आमदारांना सबुरीचा सल्ला दिला.

पितृपक्षानंतर नवरात्रात हा मंत्रिमंडळ विस्तार होईल तोपर्यंत वाट पहा असे एकनाथ शिंदे यांनी इच्छुक आमदारांना सांगितल्याची माहिती आहे. मराठवाड्यासह व राज्यातील अनेक शिंदे गटातील आमदार आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा बाळगून आहे. अशा आमदारांची संख्या तब्बल 50 असून आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात यापैकी किती जणांना संधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in