राणाजगजितसिंह समर्थकाच्या माघारीने मधुकर चव्हाणांचे सुपुत्र जिल्हा बॅंकेत बिनविरोध!

माजी मंत्री चव्हाण यांचे चिरंजीव सुनील यांच्या बिनविरोध निवडीमुळे तुळजापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
Sunil Chavan
Sunil ChavanSarkarnama

तुळजापूर : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या समर्थकाने माघार घेतल्याने काँग्रेसचे (congress) माजी मंत्री मधुकरराव चव्हाण (Madhukar Chavan) यांचे सुपुत्र सुनील चव्हाण यांची संचालकपदी बिनविरोध निवड होणार हे गुरुवारी (ता. १० फेब्रुवारी) निश्चित झाले. त्यामुळे चव्हाण गटाला पुन्हा बळ मिळणार आहे. तालुक्यावर भाजपचे वर्चस्व आहे. मात्र, माजी मंत्री चव्हाण यांचे चिरंजीव सुनील यांच्या बिनविरोध निवडीमुळे तुळजापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. (Former Minister Madhukar Chavan's son Sunil Chavan elected unopposed in Osmanabad District Bank)

उस्मानाबाद जिल्हा सहकारी बॅँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून तुळजापूर तालुक्यातील सोसायटी मतदार संघातील बहुतांशी इच्छुकांनी चव्हाण यांना पाठिंबा देण्याचे ठरविले होते. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे समर्थक विक्रमसिंह देशमुख यांनी चव्हाण यांच्या विरुद्ध अर्ज होता. मात्र, निवडणुकीतून देशमुख यांनी गुरुवारी माघार घेतल्याने चव्हाण यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. चव्हाण यांची बिनविरोध निवड ही मागील काही निवडणुकांचा विचार करता महत्त्वाची मानली जात आहे.

Sunil Chavan
राष्ट्रवादी नगरसेवकाच्या आरोपानंतर अस्वस्थ महेश कोठे थेट रुग्णालयात ॲडमिट!

मागील लोकसभा निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठीशी आघाडी धर्म म्हणून मधुकरराव चव्हाण होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून तुळजापूरचे तत्कालीन विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांचाच पराभव केला. त्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर पंचायत समितीतील काँग्रेसच्या सदस्यांना फोडत राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांना सोबत घेऊन पंचायत समितीमधील काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली होती. त्यामुळे माजी मंत्री चव्हाण आणि सुनील चव्हाण यांच्या राजकीय वाटचालींना तालुक्यातच आव्हान उभा राहते की काय, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती.

Sunil Chavan
तानाजी सावंत महाविकास आघाडीसोबतच; राणा पाटलांची कोंडी

चव्हाण यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय फासे टाकत अनेक प्रस्थापितांना घरचा रस्ता दाखवला. तालुक्यातील तामलवाडी, जळकोट, अणदूर अशा अनेक मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसप्रणित कार्यकर्त्यांनी यश मिळविले होते. चव्हाण यांनी मागील सहा महिन्यांमध्ये तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या ऊस गाळपाचा प्रश्न मिटवण्याकरिता मोठे प्रयत्न केले. तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना गोकूळ शुगर्सला चालविण्यास देण्यात आला. एवढेच नव्हे तर तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू झालेला आहे. आता जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडीचा चव्हाण यांचा मार्ग मोकळा झाल्याने तुळजापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com