मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यात उशीरापर्यंत लाऊडस्पीकर ; पोलिसात तक्रार दाखल..

क्रांती चौक येथे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील शिंदे गटातील आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. (Eknath Shinde)
Complaint Against Cm Eknath Shinde News Aurangabad
Complaint Against Cm Eknath Shinde News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबादेतील दोन दिवसांचा दौरा सध्या चांगलाच चर्चेत आहे. बंडखोर आमदारांना दिलेले आश्वासन, त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांचे उद्धाटन, भुमीपूजनाचे कार्यक्रम या सगळ्यांना हजेरी लावत शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलेला शब्द पाळला याबद्दल त्यांचे कौतुक देखील होत आहे. (Shivsena) परंतु शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी रात्री साडेदहानंतर लाऊडस्पीकर वाजवल्यामुळे आता ते अडचणीत आले आहेत.

सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याची तक्रार शहरातील क्रांतीचौक पोलस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. (Aurangabad) आनंद ज्ञानदेव कस्तुरे असे तक्रारदाराचे नाव असून त्याने मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल केल्याने याची चर्चा होत आहे. शिवसेनेने देखील लाऊडस्पीकर उशीरापर्यंत वाजवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. परंतु यावर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे, आम्ही तक्रार करणार नाही, अशी भूमिका आमदार अंबादास दानवे यांनी घेतली होती.

त्यानंतर आज या प्रकरणात कस्तुरे नावाच्या व्यक्तीने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता पोलिसांकडून या तक्रार अर्जावर काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३०, ३१ जुलै रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ३१ रोजी आमदार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील सभा आटोपून ते रात्री आठनंतर शहरात आले होते. त्यानंतर शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यास त्यांनी अभिवादन केले.

Complaint Against Cm Eknath Shinde News Aurangabad
आमदार शिरसाटांची प्रतिष्ठा पणाला, एका ग्रामपंचायतीसाठी सगळ्या पक्षाचे नेते मैदानात..

त्यानंतर शहरातील आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, पैठणचे संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात व त्यांच्या संपर्क कार्यालायांना देखील शिंदे यांनी बेटी दिल्या. क्रांती चौक येथे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील शिंदे गटातील आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. क्रांती चौकात मुख्यमंत्री रात्री उशिरा साडेदहा वाजता पोहचले.

तिथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले, लाऊडस्पीकरचा वापर देखील करण्यात आला होता. पण दहा वाजेचा नियम यावेळी पाळण्यात आला नाही. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याची तक्रार आनंद कस्तुरे यांनी केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com