राजकारण तापलं! औरंगजेबाच्या कबरीजवळ तणाव वाढला

Hindu-muslim politics| एमआयएमचे नेत्यांनी गेल्या आठवड्यात औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले.
Hindu-muslim politics|
Hindu-muslim politics|

Aurangabad latest news

औरंगाबाद : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी गेल्या आठवड्यात कार्यकर्त्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यानंतर मनसेने औरंगजेबचं हे कबर उद्धवस्त करण्याची मागणी केली. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आता मनसेच्या मागणीनंतर औरंगाबाद येथील स्थानिक नागरिकांनीही औरंगजेबाच्या कबरीविरोधात आक्रमक झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांनी औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंदच करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी आज औरंगजेबाची कबर पाहण्यासाठी पर्यटकांना जाऊ दिले नाही. ज्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत नागरिकांना शांत केलं त्यामुळे तणाव निवळला.

Hindu-muslim politics|
भाजपमधील वाद पेटला; निवडणुकीच्या तोंडावर वसुंधराराजेंनी पक्षाला आणलं अडचणीत

खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय पक्षांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ही मशीद उखडून टाकण्याचीही भाषा करण्यात आली. तर राज्य सरकारकडे तशी औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीची अज्ञातांकडून मोडतोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना या मशिदीत येण्यास परवानगीच न देण्याचा आग्रह स्थानिक करत आहेत.

एमआयएमच्या नेत्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर सामान्य नागरिकांसह राजकीय पक्षांतूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर ही मशिदच उखडून टाकण्याचे इशारे देण्यात आले. मनसेनेही औरंगजेबाची कबर नष्ट करण्याची मागणी केली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीची अज्ञातांकडून मोडतोड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांनाही त्या कबरीजवळ जाण्यास परवानगी न देण्याचा आग्रह नागरिकांकडून केला जात आहे. .

12 मे रोजी एमआयएमचे नेत्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने शिवसेना भाजपसह अनेक हिंदूत्ववादी संघटनांंनी याचा तीव्र निषेध व्यक्त केला. संभाजी राजांची हत्या करणाऱ्या आणि आपल्याच कुटूबियांचा क्रुर छळ करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीसमोर कुणी नतमस्तक होऊच कसं शकतं? असा सवालही विचारण्यात आला. तर डॉ. भागवत यांनीदेखील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. तर काही हिंदुत्ववादी संघटनांनी तर ही कबर उखडूनच का टाकू नये, असा सवाल उपस्थित केला आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com