विधान परिषद : पंकजा मुंडेंची दावेदारी यावेळी अधिक बळकट

मध्यप्रदेश भाजपचे सहप्रभारीपद असल्यामुळे दिल्ली भाजपध्ये त्यांची उठबस अधिक वाढली आहे. गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची देखील मुंडेंवर मर्जी असल्याचे मानले जाते. (Pankaja Munde)
Bjp Leader Pankaja Munde News in Marathi, Beed Latest Marathi News
Bjp Leader Pankaja Munde News in Marathi, Beed Latest Marathi NewsSarkarnama

बीड : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यात सख्य नाही आणि राज्य भाजपकडून (Bjp) मुंडेंचे खच्चीकरण केले गेले हे वास्तव आहे. मात्र, मध्यप्रदेश भाजपच्या सहप्रभारी म्हणून काम करताना केंद्रीय भाजपात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी चांगले बस्तान बसविले आहे. यासह भविष्यातील महाराष्ट्रातील निवडणुकांचा विचार करता यावेळी विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांना भाजप संधी देईल, असे मानले जाते. मात्र, पुन्हा त्या मास लिडर असल्याने त्यांना परिषदेवर घेतले तर विरोधी पक्षनेते पदही द्यावे लागेल हा आणखी एक अडथळाही मानला जातो. (Pankaja Munde News in Marathi)

महायुती सरकारच्या आपले व देवेंद्र फडणवीसांचे सख्य असल्याचे पंकजा मुंडे म्हणत तर देवेंद्र फडणवीसांचेही हेच वाक्य असे. मात्र, दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल किती चांगूलपण हे भाजपवासिय आणि राजकीय जाणकारांना चांगले माहित. त्या काळात त्यांचे महत्वाचे खातेही कमी करण्यात आले. (Marathwada) तत्कालिन सरकारच्या काळात सत्ता पदांतही जिल्ह्याच्या व पंकजा मुंडे समर्थकांच्या वाट्याला फारसे काही लागले नाही. शेवटच्या काही दिवसांपुरते दिवंगत गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाच्या अध्यक्षपदाचा अपवाद ठरला.

उलट पंकजा मुंडेंचे राजकीय विरोधक असलेल्या विनायक मेटे यांना कायम फडणीसांकडून मदत आणि विधान परिषदही मिळाली. तेव्हापासूनच मुंडेंचे एकेक शिलेदार पदांचे मुकूट चढवून मुंडेंपासून दुर करण्याचे प्रयत्न करण्याचा सिलसिला सुरु झाला. यात सुरजितसिंह ठाकूर, डॉ. भागवत कराड, रमेश कराड आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे रमेश कराड यांचे विधान परिषदेसाठी नाव झाल्यावेळी पंकजा मुंडे यांनी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरु केल्याचेही समोर आले होते.

तोच प्रकार त्यांच्या भगीनी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या बाबतही घडला. ज्युनिअर भारती पवार, डॉ. कराड यांची वर्णी लावण्यात आली. एकूणच राज्य पातळीवर मुंडेंचे खच्चीकरण करण्याची एकही संधी राज्य भाजपने सोडली नाही. तर, गोपीचंद पडळकरांना मोठे करुन कट्टर मुंडे समर्थक महादेव जानकर यांनाही चेक देण्यात आला. दरम्यान, पंकजा मुंडे देखील आपला स्पष्टवक्तेपणा, करणखर भूमिकेवर कायम ठाम दिसतात.

Bjp Leader Pankaja Munde News in Marathi, Beed Latest Marathi News
Raosaheb Danve : तेव्हा आम्ही राजेंचा सन्मान केला, शिवसेना त्यांना बंधनात अडकवत आहे..

आता त्यांच्याकडे मध्यप्रदेश भाजपचे सहप्रभारीपद आहे. त्यामुळे दिल्ली भाजपध्ये त्यांची उठबस अधिक वाढली आहे. गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची देखील मुंडेंवर मर्जी असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या यावेळच्या विधान परिषदेच्या उमेदवारीत अडचण येणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे. राज्यातील भाजपनेतेही यावेळी पंकजा मुंडेंना टाळण्याचा फारसा प्रयत्न करणार नाहीत असे चित्र आहे.

दरम्यान, सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद प्रविण दरेकर यांच्याकडे असून त्यांचीही मुदत संपत आहे. यासह प्रसाद लाड, सदाभाऊ खोत व भाजपच्या कोट्यातून आमदार असलेले शिवसंग्राम अध्यक्ष विनायक मेटे यांची मुदत संपत आहे. प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांचे नाव निश्चित मानले जातात. यासह पंकजा मुंडे यांचे नावही आघाडीवर आहे. फक्त त्यांना विधान परिषदेवर घेतल्यानंतर मास लिडर असल्याने त्यांना विरोधी पक्षनेतेपद देखील द्यावे, लागेल हीच काय ती अडचण आहे. आता नेमका सुला कसा होतो हे पहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com