Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

नेत्याच्या पत्नीला उमेदवारी नाकारली, भाजपचे सगळे उमेदवार माघार घेणार ! प्रदेशाध्यक्षांना पत्र

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सोमेश्वर सोप्पा यांच्या पत्नी शिला यांनी शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये उमेदवारी मागितली होती, परंतु ती नाकारण्यात आली. (Latur District)

जळकोट : नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवरांनी नामनिर्देशन पञ मोठ्या उत्साहात दाखल केले. मात्र एका ज्येष्ठ भाजप नेत्यांच्या बायकोला पक्षाने उमेदवारी नाकारली म्हणून आता सगळे उमेदवार माघार घेण्याच्या तयारीत आहेत. तसे पत्रच या सगळ्या उमेदवारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवले आहे.

नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू होऊन सगळ्या राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जळकोट नगरपंचायतीत देखील भाजपच्या उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. पण शहरातील प्रभाग पाचमधून निवडणूक लढण्यास इच्छूक असलेल्या भाजपच्या एका जेष्ठ नेत्याच्या पत्नीला पक्षाने उमेदवारी नाकारली.

त्यामुळे आपल्या नेत्यावर अन्याय झाला या भावनेतून आता अर्ज दाखल केलेले सर्वच उमेदवार माघार घेण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवलेल्या पत्रात जळकोट नगरपंचायत निवडणकीत मुख्य उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सतरा जांगासाठी भरलेले उमेदवारी अर्ज ९ रोजी परत घेणार असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सोमेश्वर सोप्पा यांच्या पत्नी शिला यांनी शहरातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये उमेदवारी मागितली होती, परंतु ती नाकारण्यात आली. नगरपंचायतीमध्ये विरोधकांशी हातमिळवनी करत भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड व माजी आमदार सुधाकर भालेराव हे पक्ष संपवत असल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात आला आहे.

दहा वर्षापासून या दोन नेत्यांमधील मतभेदामुळे पक्ष अधोगतीला चालला असल्याचे पाटील यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच आवर घालून पक्षाचे होणारे नुकसान टाळावे,व तात्काळ विचार घ्यावा, असेही पत्रात नमूद केले आहे.

या पत्रावर भाजपकडून बिफार्मसह नामनिर्देशन पञ भरलेल्या दत्ताञय नामवाड, रत्नमाला देशमुख, बिस्मिला बेग, तैबाबी सय्यद, शिला सोप्पा, किसन धुळशेट्टे, स्वाती गुड्डा,जगन्नाथ मैलारी, बालाजी नामवाड, मथुराबाई नामवाड,आशा गायकवाड, ललिता गायकवाड, चंद्रभागा गुट्टे,अमोल गुट्टे, सविता धुळशेट्टे, सुमन तोगरे अनुसया भोसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Chandrakant Patil
स्वातंत्र्य तर संघर्षातून मिळाले; भीक म्हणून मिळाल्या असतील तर त्या पदव्या आणि पुरस्कार

याबाबत माजी मुख्यमंत्री देवेद्र फडवणीस, माजी पालकमंञी संभाजी निलेगकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड, माजी आमदार सुधाकर भालेराव यांनाही या संदर्भात लेखी कळवण्यात आले आहे. दोन दिवसात भाजपचे वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांचे लक्ष लागले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून भाजपमध्ये तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, अहमदपूर विधानसभा मतदार संघाचे प्रचारक म्हणून सोमेश्वर सोप्पा यांनी काम केले आहे. पक्ष वाढीसाठी झटणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्यालाच डावलण्यात आल्यामुळे इतर भाजप उमेदवारांमध्ये असंतोष खदखदतो आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com