भाजपमधून बाहेर पडताच नेत्याची भविष्यवाणी :राधाकृष्ण विखे होणार नवे प्रदेशाध्यक्ष

अमित शहा सिंधुदुर्गमध्ये गेले आणि नारायण राणे मंत्री झाले. काही दिवसांपुर्वी शहा शिर्डीत जाऊन आले. (Bjp Maharashtra)
Gavhane-Vikhe Patil
Gavhane-Vikhe PatilSarkarnama

मुंबई : पाच राज्यातील निवडणुका जाहीर झाल्या आणि भाजपला जणू गळतीच लागली. उत्तर प्रदेशात रोज भाजपचा (Bjp) मंत्री, आमदार, नेता समाजवादी किंवा अन्य पक्षात जातोय. हीच परिस्थिती गोवा राज्यात देखील पहायला मिळते. (Radhakrishna Vikhe Patil) तर इकडे मराठवाड्यात भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल होण्याचेही सत्र सुरू झाले आहे.(Ncp) परभणीतील भाजपचे नेते आणि शेकापचे माजी आमदार विजय गव्हाणे यांनी वीस वर्षानंतर भाजपला रामराम म्हणत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

हा प्रवेश करत असतांनाच त्यांनी एक भाकीत केले, ते म्हणजे भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होतील. आता यावरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगितुरा रंगण्याची शक्यता आहे. मुंबईच्या राष्ट्रवादी भवनात विजय गव्हाणे यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवारांचे नेतृत्व मान्य करत पक्षात प्रवेश केला. यावेळी केलेल्या भाषणात गव्हाणे यांनी भाजपच्या बदलत्या विचारसरणी आणि बहुजनांवर होणारा अन्याय याची काही उदाहरणे दिली.

गव्हाणे म्हणाले, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या काळातील भाजप आता राहिलेली नाही. ती झपाट्याने बदलते आहे. मुंडेच्या राजकीय मैत्रीतून मी भाजपमध्ये गेलो, पण २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडेंचे निधन झाले, त्यानंतर मी दिल्लीत आणि तिथल्या भाजप कार्यालयात कधी पाय ठेवला नाही. या पक्षात बहुजनांवर सातत्याने अन्याय होत आहे. आमच्या काळात १७ संघटनमंत्री होते, त्या पैकी १४ जणांना हटवण्यात आले आणि त्यांच्या जागी उच्चवर्णीयांची वर्णी लावण्यात आली.

राज्यातील भाजप देवेंद्र फडणवीस चालवतात, तेच पक्षाचा चेहरा आहे असे भासवले जात असले तरी ते फक्त स्टेजवरचे अॅक्टर आहेत, खरा पक्ष नारायण राणे, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील हेच चालवतात, असा दावाही गव्हाणे यांनी केला.

Gavhane-Vikhe Patil
खुद्द पवारच म्हणाले,`हा गडी तिकडे जास्त रमणार नाही, याची मला खात्री होती..

अमित शहा सिंधुदुर्गमध्ये गेले आणि नारायण राणे मंत्री झाले. काही दिवसांपुर्वी शहा शिर्डीत जाऊन आले, तेव्हा मी विखेंना म्हणालो, दादा आता तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार. ओबीसी, मराठा आरणासह अनेक मुद्यांवर भाजपची भूमिका बदलली आहे, असेही गव्हाणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com