Latur News : रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्धाटन नव्या वर्षात मोदींच्या हस्ते होणार..

Railway Coach Factory : या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये ७० टक्के स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
Marathwada Railway Coach Factory News, Latur
Marathwada Railway Coach Factory News, LaturSarkarnama

Marathwada : फडणवीस मुख्यमंत्री असतांना मराठवाड्यातील लातूर येथे रेल्वे कोच तयार करणाऱ्या कारखान्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी जागा देखील राज्य सरकारने उपलब्ध करून दिली होती. कारखान्यासाठी आवश्यक मुलभूत सुविधा परवून देखील प्रत्यक्षात अजून ही (Railway Coach Factory) कोच फॅक्टरी सुरू होऊ शकली नाही.

Marathwada Railway Coach Factory News, Latur
Sandipan Bhumre : ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गट चौथ्या क्रमांकावर, तरी आम्हाला गद्दार म्हणतात..

परंतु आता नव्या वर्षात (Marathwada) मराठवाड्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार देणारी रेल्वे कोच फॅक्टरी प्रत्यक्षात सुरू होणार आहे. (Latur) लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी नुकतीच दिल्लीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली तेव्हा निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर जानेवारी अखेरीस या कोच फॅक्टरीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या रेल्वे फॅक्टरीची निविदा प्रक्रिया सुरू असून ती पुर्ण होताच प्रत्यक्ष उद्धाटन आणि कोच निर्मितीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये ७० टक्के स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर संबंधित कंपनी सर्वेक्षणाचे काम पुर्ण करणार आहे.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यासाठी पंतप्रधानांना लवकरच निमंत्रित करण्यात येणार असल्याचेही रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. याशिवाय लातूर येथे रेल्वे पिटलाइन उभारणीसाठी मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी देखील शृंगारे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com