Latur : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला राष्ट्रपती येणार

राज्यपाल भगतसिंग कोशयारी, खासदार शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर आदींना या संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले आहे. (Latur District)
95th All India Marathi Literary Conference
95th All India Marathi Literary ConferenceSarkarnama

लातुर : जिल्ह्यातील उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात येत्या २२ ते २४ एप्रिल दरम्यान ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Latur) आयोजित करण्यात आले आहे. आयोजकांकडून देशाचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना या संमेलनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. (Marathwada) राष्ट्रपती या संमेलनाच्या समारोपाला २४ एप्रिल रोजी उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष तथा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Ramnath Kovind)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याने हे संमेलन यशस्वी करण्यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पुढाकार घेतला आहे. उदगीर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण आयोजकांकडून देशभरातील अनेक मान्यवरांना देण्यात आले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगतसिंग कोशयारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर आदींना या संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

95th All India Marathi Literary Conference
अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या किर्तनकारावर गुन्हा दाखल करा ; गृहमंत्र्यांना पत्र

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगितले. यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रामेशप्पा कराड, आमदार विक्रम काळे महापौर विक्रांत गोजमगुंडे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागरालकार आदी मान्यवर उपस्थित होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com