बिनबोभाट अवैध वाळू वाहतूकीसाठी दीड लाखाची लाच मागणारा तहसिलदार जाळ्यात..

प्रती ट्रक ३० हजार या प्रमाणे दोन ट्रकचे ६० हजार महिना या प्रमाणे ती महिन्याचे १ लाख ८० हजार रुपये तहसिलदार जाधव यांनी मध्यस्थामार्फत मागितले होते. (Sandmafiya)
Tehsildar caught in Acbs Trap In Nilanga
Tehsildar caught in Acbs Trap In NilangaSarkarnama

निलंगा : तालुक्यात अवैध वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तरी देखील त्यावर कारवाई करण्याऐवजी ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे तेच वाळु माफियांशी हातमिळवणी करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. (Latur) बिनबोभाट कुठलीही कारवाई न करता अवैध वाळू (SandMafiya) वाहतुकीला परवानगी हवी असेल तर तीन लाख दे, अशी मागणी करणाऱ्या व ती लाच स्वीकारणाऱ्या निलंगा येथील तहसिलदारास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

तीन ट्रकमधून वाळूची वाहतूक करण्यासाठी व कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी एका व्यक्तीकडे प्रति ट्रक तीस हजारांची मागणी तहसिलदार गणेश जाधव यांनी केली होती. (Marathwada) त्यानूसार मागील तीन महिन्याचे एकूण एक लाख ८० हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर तडजोडी अंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले. तहसीलदार गणेश जाधव यांच्या घरासमोर स्वतः गणेश दिगंबरराव जाधव आणि खाजगी व्यक्ती रमेश गुंडेराव मोगरगे यांना ही रक्कम स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

तक्रारदाराकडून वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे चालू देण्यासाठी व वाळूच्या ट्रकवर या पुढे कारवाई न करण्यासाठी प्रती ट्रक ३० हजार या प्रमाणे दोन ट्रकचे ६० हजार महिना या प्रमाणे ती महिन्याचे १ लाख ८० हजार रुपये तहसिलदार जाधव यानी मध्यस्थामार्फत मागितले होते. तडजोडीनंतर दीड लाखाची रक्कम एजंट रमेश मोगेरगे यांचे कडे देण्यास सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे आज रोजी रमेश मोगेरगे याने निलंगा येथे तहसीलदार जाधव यांच्या घरासमोरच लाचेची रक्कम दीड लाख रुपये पंचासमक्ष घेतली.

Tehsildar caught in Acbs Trap In Nilanga
लातूर -गुलबर्गा रेल्वे औशातूनच हवी , पवारांची फडणवीसांकडे मागणी ; निलंगेकर बघतच राहिले..

दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तात्काळ दोन्ही आरोपींना पकडले. या कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान लातूर जिल्ह्यातील मांजरा व तेरणा नदीत अवैध वाळू उपशासाठी बोटींचा सर्रास वापर केला जात आहे. पर्यावरण विभागाचे सगळे नियम धाब्यावर बसवून हे प्रकार सुरू आहेत. अवैध वाळू उपशा संदर्भात अनेक तक्रारी असूनही तहसिलदार कारवाई करत नव्हते. तहसिलदार जाधव यांच्या औरंगाबादेतील घरावर देखील छापे टाकण्यात आल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com