Latur : अभिमन्यू की संभाजी ? मंत्रीपदासाठी फडणवीस कोणाची निवड करतील..

आता एक जुलै रोजी फडणवीसांचा शपथविधी आणि त्याच दिवशी अभिमन्यू पवारांचा वाढदिवस असल्याने मंत्रीपदाची माळ पवारांच्या गळ्यात घालणार का? (Mla Abhimanyu Pawar)
Mla Abhimanyu Pawar-Devendra Fadanvis-Sambhjaipatil Nilangekar
Mla Abhimanyu Pawar-Devendra Fadanvis-Sambhjaipatil NilangekarSarkarnama

औसा : महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि बंडखोर आमदारांच्या साथीने सरकार स्थापण्याचा चंग माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधला. (Latur) भाजपा सत्तेत येईल असेच चित्र असतांना देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू व निकटवर्तीय समजले जाणारे औशाचे (Abhimanyu Pawar) आमदार अभिमन्यू पवार यांची फडणवीस यांच्या मंत्री मंडळात वर्णी लागणार का? याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे २०१४ मध्ये मंत्री असलेले संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) हे देखील रेसमध्ये आहेत. उद्या, एक जुलै रोजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा शपथविधी पार पडणार आहे, त्यात फडणवीस अभिमन्यू की संभाजी यापैकी कोणाची निवड करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

एक जुलै रोजी योगायोगाने आमदार अभिमन्यू पवारांचा वाढदिवस असून गुरु आपल्या शिष्याला मंत्रीपदाची भेट देणार का? हे पहावे लागेल. विरोधी पक्षातील आमदार असुनही आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतरस्त्याचा औसा पॅटर्ण संबंध राज्याला दिशा देणारा उपक्रम राबविला. शेकडो किलोमिटर रस्ते मोकळे करीत बांध तेथे रस्ता देण्याच्या त्यांच्या या कार्याची भुरळ देशातील आनेक राज्यांना पडली.

कांही दिवसांपुर्वीच अंगात एकशे दोन ताप असतांना देवेंद्र फडणवीस यांनी औशातील भव्य शेतकरी मेळाव्याला व पवारांनी केलेल्या कामांच्या लोकापर्ण व उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावत "जो एखादा मंत्रीही असे काम करु शकत नाही असे काम अभिमन्यू यांनी केल्याची स्तुती खुद्द फडणवीस यांनी संभाजी पाटील निलंगेकरांसमोरच केली. याच कार्यक्रमात संभाजी पाटील यांनी देखील जे आम्हाला जमले नाही ते तुम्ही करुन दाखविले अशी पुष्टी जोडली होती.

अजारी असतांनाही अभिमन्यूसाठी फडणवीसांनी थांबणे, त्यांच्या बाबत गौरोद्गार काढणे, त्यांची पाठ थोपटणे हे आगामी काळासाठी सुचक असल्याचे मानले जाते. आता एक जुलै रोजी फडणवीसांचा शपथविधी आणि त्याच दिवशी अभिमन्यू पवारांचा वाढदिवस असल्याने मंत्रीपदाची माळ पवारांच्या गळ्यात घालणार का?

Mla Abhimanyu Pawar-Devendra Fadanvis-Sambhjaipatil Nilangekar
शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे, हा वाद निवडणूक आयुक्त सोडवू शकतात !

मात्र हे करीत असतांना फडणवीसांना निलंगेकरांना दुखवणेही सोपे जाणार नसल्याने निलंगेकरांपेक्षा पवारांचे वजन वाढवितांना त्यांना मोठी कसरत करावी लागणार हे मात्र नक्की. कारण कॉंग्रेसचा बालेकिल्ला जमीनदोस्त करीत संबंध लातूर जिल्हा भाजपामय करण्यात संभाजी पाटील यांचे मोठे योगदान आहे हे पण पक्षश्रेष्टींना विसरता येणार नाही.

एकीकडे पट्टशिष्य तर दुसरीकडे त्यांच्याच तालमीत तयार झालेला तगडा कार्यकर्ता या दोघांमध्ये सुसंवाद वाढविणार नाहीत ते फडणवीस कसले? सुसंवाद वाढवून ते कुणाला झुकते माप देणार यावर जिल्ह्यातील भाजपचे पुढील राजकारण अवलंबून असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com