Latur News : वाळू माफियांची आता खैर नाही, थेट स्थानबद्धतेची कारवाई होणार..

Sand Mafiya : या कायद्यातील तरतुदीनुसार वाळू माफियांना एक वर्ष स्थानबद्ध करून तुरंगात डांबता येते.
Sand Mafiya News, Latur District
Sand Mafiya News, Latur DistrictSarkarnama

Marathwada : अवैध वाळू चोरी रोखून वाळू माफियांना आळा घालणअयासाठी महसूल विभागाकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. यापूर्वी संवेदनशील वाळूघाटावर जमावबंदी आदेश लागू केल्यानंतरही (Sand Mafiya) वाळू चोरीचा प्रकार थांबत नसल्याने वरिष्ठ पातळीवरून वाळू चोऱ्यांविरूद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानंतरही वाळू चोरी कमी होईना, त्यामुळे प्रशासनाने आता वाळू माफियांविरूद्ध एमपीडीए अर्थात महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sand Mafiya News, Latur District
Shivsena : ओमराजे म्हणतात, भाजपला मैदानात तर येवू द्या, आत्ताच कशाला अंगावर घेवू..

तशा हालचाली महसूल व पोलीस विभागाने सुरू केल्यामुळे मांजरा नदीच्या काठावर वाळू चोरी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. (Latur) येथे काही दिवसापूर्वी आयोजित महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यांनी वाळू माफियांना चांगला धडा शिकवण्यासाठी कडक पावले उचलण्याचे आदेश दिले. (Marathwada) यातूनच वाळू चोरी व बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांविरूद्ध एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करणे शक्य असल्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी स्पष्ट केले.

महसूल व पोलीस विभागाने वाळू माफियांना रोखण्यासाठी एमपीडीए कायद्याचे हत्यार उचलले आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार वाळू माफियांना एक वर्ष स्थानबद्ध करून तुरंगात डांबता येते. तालुक्यातून मांजरा व तेरणा या दोन नदीकाठच्या गावातील काही विक्रेत्यानी पूर्वी रेतीची साठवणूक केली होती. वाळूचे ढिगाऱ्याचे पंचनामे करून जप्त केले व त्यांना नियमानुसार दंड लावण्यात आले. सध्या खासगी व सरकारी कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून वाळूची मागणी सतत होत आहे.

पावसाचे पर्जन्यमान चांगले झाले असल्याने मांजरा व तेरणा नदीवरील बॅरेजस पूर्ण क्षमतेने भरले असून आता वाळू (रेती) सहज मिळणे शक्य नसल्याने रेतीचा भावही वधारला आहे. मांजरा व तेरणा नदीकाठचे जवळपास ६० गावे असून यातील काही गावातील वाळू घाटांचा लिलाव करावा असा प्रस्ताव यापूर्वीच उपविभागीय कार्यालयाने पाठवला आहे. सध्या वाळूच मिळत नसल्याने बांधकामात सर्रासपणे खडीकेंद्रावरील दगडी 'कच' चा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

चोरून वाळूची विक्री होत असल्याने महसूल प्रशासकडून दोन वाहनावर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महसूल विभागाकडून वाळू चोरी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असून वाळू चोरी करणाऱ्या वाहनावर दंड अकारणे, ज्या जमिनीतून वाळू उपसा सुरू आहे त्या जमिनीवर बोजा चढवणे, संवेदनाशील वाळू घाटावर जमावबंदी आदेश लागू करणे या कारवाया सुरू आहेत.

Sand Mafiya News, Latur District
Abdul Sattar : अधिवेशनात राजीनाम्याची मागणी करणारे दानवे सत्तारांच्या निशाण्यावर...

एवढे प्रयत्न करूनही वाळू चोरीचे प्रकार थांबत नसल्याने जिल्हाधिकारी बी. पृथ्वीराज व पोलिस अधिक्षक सोमय्या मुंढे यांनी बैठक घेऊन विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलिसात गुन्हे दाखल करूनही हा प्रकार थांबत नसल्यास संबंधित वाळूमाफीयावर आता स्थानबध्दतेची कारवाई केली जाणार आहे.

याबाबत उपविभागीय अधिकारी शोभा जाधव म्हणाल्या , निलंगा उपविभागातील देवणी, शिरूरअनंतपाळ व निलंगा तहसीलदारांना वाळू चोरी रोखण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. संबंधित वाहनावर गुन्हे दाखल केले जाणार असून त्यामध्ये न्यायालयाचा व महसूल विभागाचा दंड अकारण्यात येणार आहे. त्यानंतरही वाळू चोरी थांबली नाही तर एमपीडीए कायद्यातील तरतुदीनुसार वाळू माफियांवर स्थानबध्दतेची कारवाई केली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in