Latur News : निलंगेकर-पवारांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा ग्रामस्थांच्या डोक्याला ताप..

Nilangekar-Pawar's Politics: नागरिकांची मते जाणून न घेता निलंगा तालुक्यातील औसा मतदार संघातील गावे कासारसिरशी येथे जोडन्याचा घाट घातला आहे.
Sambhaji Patil Nilangekar-Abhimanyu Pawar News
Sambhaji Patil Nilangekar-Abhimanyu Pawar NewsSarkarnama

Marathwada Politics: एकाच पक्षात असूनही एकमेकांचे राजकीय विरोधक असल्यासारखे वागणारे निलंग्याचे भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) आणि औशाचे अभिमन्यू पवार यांच्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या दोघांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळेच नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत काही ठिकाणी पक्षाला नुकसान सोसावे लागले आहे. जिल्ह्यात अनेकदा या दोघांमधील वादाचे प्रकार समोर आले आहेत.

Sambhaji Patil Nilangekar-Abhimanyu Pawar News
Pankaja Munde vs Dhananjay Munde: मुंडे बहीण-भाऊ पुन्हा आमनेसामने; वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक जाहीर, 'या' दिवशी होणार मतदान

आता अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी निलंगा तालुक्यातील औसा मतदार संघाला असलेली ६८ गावचे केंद्र म्हणून कासारसिरशी येथे विजवितरण उपविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग याचे उपविभागीय कार्यालय मंजूर झाले आहे. (Latur) त्यातच आणखी एक भर म्हणून कासारसिरसी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी यापूर्वीच हलचाली सुरू होत्या.

दोन दिवसापूर्वीच याबाबतचा शासन निर्णय निघाला असून औसा विधानसभा मतदार संघाला निलंगा तालुक्यातील जोडलेल्या ६८ गावांसाठी कासारसिरसी येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. (Marathwada) मात्र मदनसुरी महसूल मंडळाअंतर्गत येणारे मदनसुरी, रामतीर्थ, धानोरा, बामणी, जेवरी, लिंबाळा, येलमवाडी, जेवरी, सरवडी, एकोजी- मुदगड, नदीहत्तरगा, कोकळगाव, हाडोळी गावाला बाजार पेठ, शाळा, कॉलेज, दवाखाना या दृष्टीकोनातून निलंगा हे महत्वाचे शहर आहे.

कासारसिरशी येथे जरी अप्पर तहसील झाले तरी आमचा शासकीय व्यवहार निलंगा येथील तहसील कार्यालयाकडे ठेवावा, ही गावे निलंगा येथेच जोडावी अशी मागणी येथील नागरिककांनी निवेदनाद्वारे केली आहे. दळणवळणासाठी कासारसिरशी पेक्षा निलंगा अंतर जवळ असून कोणत्याही परिस्थितीत मदनसुरी मंडळातील गावे कासार सिरशीला जोडू नये अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. या मंडळातील काही गावच्या ग्रामपंचायतचे ठरावही तहसीलदार अनुप पाटील यांना निवेदनाद्वारे दिले आहेत. (Political Short Videos)

आमदारांनी राजकीय स्वार्थासाठी नागरिकांची मते जाणून न घेता निलंगा तालुक्यातील औसा मतदार संघातील गावे कासारसिरशी येथे जोडन्याचा घाट घातला आहे. त्याला सर्वसामान्य जनतेतून पूर्ण पणे विरोध होत आहे. कोणत्याही परिस्थितीत कासारसिरशी अप्पर तहसील कार्यालयाला आमची गावे जोडू नयेत, अशी मागणी केली आहे. निलंगा सोयीचे असले तरी आमदारांच्या निर्णयाला विरोध कसा करावा म्हणून काही सरपंच दबावात असल्याचेही बोलले जाते. हा निर्णय दिर्घकाळाचा असून आमदारांच्या दबावात येऊन जर त्यानी लादलेले निर्णय लागू झाले तर गावातील नागरिकांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागणार आहे.

Sambhaji Patil Nilangekar-Abhimanyu Pawar News
Sanjay Raut News : संजय राऊतांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी न्यायालयाचा मोठा दिलासा; २० जूनपर्यंत सुनावणी लांबणीवर...

दरम्यान, निलंगा कसा सोयीस्कर आहे याबाबत कारण देतांना सरपंच म्हणाले, भौगोलिक दृष्ट्या अंतर कमी, व्यापारी दृष्टिकोनातून सर्व व्यवहार सुलभ, दळणवळणाची सर्वाधिक सुविधा, शेतकरी, मजूर, कामगार, शैक्षणिक दृष्ट्या व्यापारी, मोठी बाजारपेठ असून राजकीय, कार्यकर्ते व इतर गोष्टींसाठी सोयीचे ठिकाण निलंगा आहे. राजकीय महत्त्वकांक्षीपोटी सामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार असून सामान्यांचा बळी देऊन राजकीय स्वार्थ साधण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप मदनसुरीचे सरपंच प्रा. अशोक सुर्यवंशी यांनी केला. (Political Web Stories)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in