Latur : साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीला दिवंगत शिवाजी पाटील निलंगेकरांचा विसर
95th All India Literary ConventionSarkarnama

Latur : साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीला दिवंगत शिवाजी पाटील निलंगेकरांचा विसर

याबाबत संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांना संपर्क साधला असता ते म्हणाले आमच्या लक्षात न आल्यामुळे डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नाव राहून गेले. (Latur)

निलंगा : ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे संपन्न होत असून या संमेलनात विविध साहित्यिक, गायक, कवी तसेच राजकीय नेत्यांची नावे कार्यक्रम स्थळाला देण्यात आली आहेत. (Latur) मात्र लातूर जिल्ह्याचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नावाचा विसर मात्र संयोजन समितीला पडला आहे. (95th All India Literary Convention)

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे होत आहे. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे आणि मान्यवरांनी विशेष लक्ष घालून हे संमेलन कसे यशस्वी होईल यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. (Marathwada) उदगीर सारख्या महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरच्या तालुक्यात हे संमेलन होत असून याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

या संदर्भात अनेक वेळा बैठका संपन्न झाल्या अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या संमेलनासाठी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, छत्रपती शाहू महाराज सभामंडप, कलामहर्षी बाबुराव पेंटर कला मेळा, शांताबाई शेळके कविकट्टा, सिकंदर अली सभाग्रह, डॉ.ना.य. डोळे, हुतात्मा भाई शामलाजी व्यासपीठ, संग्रमआप्पा शेटकार, देवीसिंह चौव्हान, लोकनेते स्व.विलासराव देशमुख सभागृह, त्र्यंबकदासजी झंवर, अदीसह साहित्यिक, कलाकार ,राजकीय नेते, जिल्ह्यातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावे या साहित्य संमेलनांमध्ये सभागृह, कार्यक्रमांच्या स्थळाला, प्रवेशद्वारांना देण्यात आली आहेत.

मात्र लातूर जिल्हा निर्मितीचे शिल्पकार तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नाव मात्र कुठेही देण्यात आले नाही. याबद्दल निलंगावासियांमध्ये नाराजीचा सूर आहे. सभागृहाला प्रवेशद्वाराला कार्यक्रम ठिकाणी कुठेही त्यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने या साहित्य संमेलनाच्या कमिटीला डॉ. निलंगेकर यांचा विसर पडला की काय? अशी चर्चा सध्या होत आहे.

विशेष बाब म्हणजे दहावेळा आमदार, एकवेळा मुख्यमंत्री, अनेक वेळा कॅबिनेट मंत्री पद भूषविलेल्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मराठवाडा तसेच महाराष्ट्राचे मोठ्या दिमाखात नेतृत्व केले. राजकारणातील संत म्हणून संबोधल्या जाणाऱ्या डॉ. निलंगेकर हे साहित्यातही मागे नव्हते .त्यांनी मराठवाडा- हैदराबाद मुक्तिसंग्रामवर प्रबंध सादर करून पीएचडी मिळवली व त्याचे पुस्तकात परिवर्तित करून प्रकाशन करण्यात आले.

95th All India Literary Convention
Osmanabad : अजित पवारांनी चालवायला घेतलेले दोन्ही कारखाने फायद्यात, साखर उताराही चांगला..

तर त्यांच्यावर तेरणा काठचा सोनहीरा १) डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर,२) निष्ठावंत नेतृत्व: डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर, ३ )वैभव तेरणेचे: डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर,४) महाराष्ट्राचे लोकनेते: डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे ग्रंथ त्यांच्या जीवनावर प्रकाशित झाले आहेत. त्यामुळे साहित्यातही अग्रेसर असणारे निलंगेकर आज पडद्याआड गेले असले तरीही त्यांच्या अनेक आठवणी महाराष्ट्राला आहेत.

मात्र या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला त्यांच्या नावाचा निश्चितच विसर पडला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याबाबत संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांना संपर्क साधला असता ते म्हणाले आमच्या लक्षात न आल्यामुळे डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नाव राहून गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.