Latur : देशमुखांचा करेक्ट कार्यक्रम फसला, कारखाना ताब्यात घेत निलंगेकरांची बाजी..

कारखाना नैसर्गिक आपत्ती व कर्जाच्या अडचणीमुळे बंद अवस्थेत होता. गुढी पाडव्याच्या दिवशी निलंगेकर सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवण्यासाठी ट्वेंटीवन शुगर मिलने घेतला होता. (Sambhaji Patil Nilangekar)
Mla Sambhaji Paitl Nilangekar-Dhiraj Dehsmukh News
Mla Sambhaji Paitl Nilangekar-Dhiraj Dehsmukh NewsSarkarnama

लातूर : जिल्ह्याच्या राजकारणात निलंगेकर विरुद्ध गढीवरचे देशमुख असा संघर्ष नेहमीच पहायला मिळाला. दोन्ही बाजुंनी संधी मिळेल तेव्हा कुरघोडीचे राजकारण केले जाते. त्यात देशमुख घराणे सहकार क्षेत्रात मातब्बर म्हणून ओळखले जाते. (Latur) जिल्ह्यातील मांजरा परिवाराचे जाळे विनत आधी दिवंगत विलासराव देशमुख आणि आता त्यांच्या पश्चात दिलीपराव व त्यांचे दोन्ही पुतणे अमित आणि धीरज यांनी देखील साखर कारखानदारीत आपले पाय भक्कम रोवले आहेत.

निंलगा येथील शिवाजीराव निलंगेकर सहकारी साखर कारखाना काही दिवसांपुर्वी अमित देशमुख यांच्या ट्वेटीवन कंपनीने भाडेत्तत्वार घेतला होता. तेव्हा आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर (Sambhjai Patil Nilangekar) यांना उद्देशून ` आम्ही वेळ आली की करेक्ट कार्यक्रम करतोच`. असा टोला लगावला होता. तेव्हा याची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली होती. पण काही महिन्यातच संभाजी पाटील निलंगेकरांनी देशमुखांचा डाव त्यांच्यावरच लटवला आहे.

शिवाजीराव निलंगेकर सहकारी साखर कारखाना पुन्हा ताब्यात घेत देशमुखांचाच करेक्ट कार्यक्रम केल्याचे आता सिद्ध झाले आहे. सर्व कायदेशीर सोपस्कर पूर्ण करत या कारखान्यातील मशनिरींचे पूजन माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकरांच्या हस्ते नुकतेच केले. गेल्या कांही वर्षापासून कर्जाच्या ओझ्याने बंद असलेल्या आंबुलगा-बु ता. निलंगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना सुरू होणार का? याकडे सभासद शेतकऱ्यांचे डोळे लागले होते.

त्यातच हा कारखाना यापूर्वी ट्वेन्टी वन शूगरकडे देण्यात आला म्हणून गुढी पाढव्याच्या दिवशी तत्कालीन पालकमंत्री अमित देशमुख यांनी मशनरीचे पूजन केले होते. मात्र तांत्रिक बाबीमुळे बँकेने ट्वेंटीवनचा भाडेतत्वावरील निर्णय रद्द करून पुन्हा फेरनिविदा काढली. त्यामध्ये ओंकार साखर कारखाना प्रा. लि. यांनी चालवण्यास घेतला आहे. नुकताच माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते मशनरीचे पूजन झाल्याने निलंगेकरांनी देशमुखाच्या 'करेक्ट' कार्यक्रमाला परफेक्ट उत्तर दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Mla Sambhaji Paitl Nilangekar-Dhiraj Dehsmukh News
नामांतराच्या निर्णयानंतर चंद्रकांत खैरेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा; आता...

देवणी, शिरूरअनंतपाळ व निलंगा या तीन तालुक्यातील जवळपास बारा हजार सभासदांच्या मालकीचा असलेला आंबुलगा सहकारी साखर कारखाना कांही वर्षापासून बंद आहे. मांजरा व तेरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात बंधारे व विविध प्रकल्प झाल्याने सिंचनाचे क्षेत्र वाढल्याने हजारो हेक्टर ऊसाचे क्षेत्रही वाढले आहे. या कारखान्याचे सभासद असतानाही त्यांना अन्य कारखान्याचा आधार घ्यावा लागत होता.

आंबुलगा कारखाना सुरू करावा म्हणून यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले, मात्र त्याचा कांहीच उपयोग झाला नाही. दैनंदिन अडीच हजार टन क्षमता असलेल्या या कारखान्याचे गाळप सुरू होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. हा कारखाना नैसर्गिक आपत्ती व कर्जाच्या अडचणीमुळे बंद अवस्थेत होता. मात्र गुढी पाडव्याच्या दिवशी निलंगेकर सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवण्यासाठी ट्वेंटीवन शुगर मिलने घेतला होता.

यावेळी आमदार धिरज देशमुख यांनी थेट माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना टार्गेट करत आम्ही जोपर्यंत शांत आहोत राहू द्या..विकासाच्या आडवे येणाऱ्या लोकांचा करेक्ट कार्यक्रम करू. आमचा नाद करायचा नाही असा टोला लगावला होता. राज्य बँकेच्या तांत्रिक कारणामुळे बँकेने ट्वेंटीवन शुगरची निविदा रद्द करून पुन्हा फेरनिविदा मागवली होती. हा कारखाना आता ओंकार साखर कारखाना प्रा. लि. यांनी घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in