Latur : `चला आमच्यासोबत विधानसभेत`, राष्ट्रवादीच्या पाटलांची काॅंग्रेसच्या अशोकरावांना साद

तुमच्या सारख्या सरळ स्वभावाच्या गुणवंत नेत्यांची सध्या विधानभवनात गरज आहे. मतदारसंघातील जनतेची इच्छा देखिल हेच असल्याचे दिसून येते. (Congress)
Mla Babasaheb Patil-Congress Leader Ashok Patil Nilangekar
Mla Babasaheb Patil-Congress Leader Ashok Patil NilangekarSarkarnama

लातूर : माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे चारित्र्यसंपन्न नेतृत्व असल्याने त्यांनी हजारो कर्तृत्ववान कार्यकर्ते घडविले. (Latur) पक्षासोबत एकनिष्ठ आणि नेत्यावर निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांची वज्र्यमूठ बांधून आपलं मनगट मजबूत करा. अशोकराव (काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस) तुम्ही असंख्य कार्यकर्त्यांचा पाठबळावर माझ्याबरोबर विधानसभेला मुंबई चला, असे अवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील यांनी काॅंग्रेसच्या अशोक पाटील निलंगेकर यांना केले.

कै.जलिलमियाँ देशमुख गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा कार्यक्रमा निमित्त सिंदखेड ता.निलंगा येथे हे दोघे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी व्यासपीठावर सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांची गर्दी जमली होती. सध्या राज्याच्या सत्तेत एकमेकांसोबत असलेले राष्ट्रवादी व काॅंग्रेस (Congress) या दोन पक्षात फारसे सख्य नाही. तरी देखील राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी काॅंग्रेसच्या अशोक पाटील निलंगेकरांची तोंडभरून स्तुती केली.

पाटील म्हणाले, अशोकराव तुम्ही आणि मी एकत्रित एक विधानसभेसाठी पुर्णतः तयारी करिता व्यापक बैठक घेऊ आणि पुढील निवडणूकीसाठी सज्ज होऊन तुम्ही कामाला लागा. तुमच्या सारख्या सरळ स्वभावाच्या गुणवंत नेत्यांची सध्या विधानभवनात गरज आहे. मतदारसंघातील जनतेची इच्छा देखिल हेच असल्याचे दिसून येते.

Mla Babasaheb Patil-Congress Leader Ashok Patil Nilangekar
लिहून ठेवा, २०२४ मध्ये राज्यात भाजपचे ४३ खासदार अन् १७० आमदार : चंद्रकांत पाटील

म्हणून तुम्ही पक्ष बळकट करण्यासाठी मतदारसंघात पायाला भिंगरी बांधून जनतेत जावे, असे आवाहन करतांनाच त्यांना विधानसभेसाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा अमहदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या शुभेच्छामुळे जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली आहे.

कै.जलिलमियाँ देशमुख यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कार्य,काम,पक्ष निष्ठा आणि नेत्यांचा निष्ठवंत या सर्व जुन्या आठवणीला उजाळा देण्यात आला. अनेक मान्यवरांनी जलिलमियाँ देशमुख यांच्या नेत्यांवर असलेली निष्ठा व त्यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक व राजकीय कार्याचा गौरव केला. याच कार्यक्रमात आमदार पाटील यांनी काॅंग्रेसच्या अशोक पाटील निलंगेकर यांना विधानसभेत चला अशी साद घातली. आता यावर अशोक पाटील निलंगेकर काय प्रतिसाद देतात हे लवकरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com