लातुरमध्ये भर चौकात पोलिस अन् डॉक्टर यांच्यात 'फ्री स्टाईल'

फ्री स्टाईल मारामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
latur  police station
latur police stationsarkarnama

लातूर : वाहतूक कोडींवरुन पोलिस-डॅाक्टर यांच्यात हाणामारी झाल्याची घटना नुकतीच लातुरमध्ये (Latur)घडली. पोलिस आणि वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याप्रकरणी डॉक्टर, पोलिसावर (police-doctor) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर येथील शिवाजी चौकात हा प्रकार घडला. या फ्री स्टाईल मारामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या घटनेनंतर पोलिस अंमलदार दत्ता काळे आणि डॉ. अनंत गोरे यांना वैद्यकीय तपासणीसाठी विलासराव देशमुख वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. पोलीस अंमलदार दत्ता काळे प्राथमिक उपचार घेऊन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आले तर डॉक्टर गोरे आनंत गोरे यांना तेथेच उपचारासाठी दाखल केले आहे.

latur  police station
..त्याला राजू शेट्टीच जबाबदार राहतील ; राऊतांचा इशारा

लातूर शहरातील प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या शिवाजी चौकात नेहमीच वाहनांची गर्दी असते. याच गर्दीत शहरातील कान, नाक, घासा तज्ज्ञ डॉ. अनंत गोरे शहरातील शिवाजी चौकातून सोमवारी रात्री पावणे नऊ वाजता जात असताना त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाले आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. ही बाब त्या ठिकाणी कर्तव्यावर असणारे वाहतूक पोलीस अंमलदार दत्ता काळे यांच्या लक्षात आली.

त्यांनी डॉ. गोरे यांची गाडी बाजूला घेण्यास सांगितले. डॉ. गोरे यांनी गाडी बाजूला घेतली. दरम्यान या दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. वाद वाढत गेला आणि हमरी-तूमरी वरचं प्रकरण हाणामारीत झालं. भर चौकात पोलिस आणि डॉक्टर यांच्यातील फ्री स्टाईल नागरिकांना पाहायला मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com