Latur Bjp : यशाने हुरळून जावू नका, पुढच्या तयारीला लागा ; निलंगेकर यांचे आवाहन..

Nilanga : तालुक्यातील सर्वच जिल्हापरिषद व पंचायत समीतीवर भाजपाचा झेंडा फडकावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.
Latur Bjp News
Latur Bjp NewsSarkarnama

Marathwada : नुकत्याच झालेल्या लातूर जिल्ह्यातील निलंगा, औरादशहाजानी व देवणी बाजर समिती निवडणुकीत भाजपने जोरदार यश मिळवले. या यशाचे मानकरी ठरले भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अरविंद निलंगेकर. (Arvind Patil Nilangekar) निवडणुकीनंतर निलंग्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांचा उत्साह शिगेला पोहचला होता. तीनशे किलोचा भलामोठा हार क्रेनने घालून अरविंद निंलगेकर यांचे निलंग्यात स्वागत करण्यात आले.

Latur Bjp News
PWD Minister Ravindra Chavan : रस्त्यावर पडणाऱ्या पावसातून भूजल पुनर्भरणाचा `लातूर पॅटर्न` राज्यभर राबवणार..

निलंगा मतदार संघातील निलंगा, औरादशहजानी, देवणी, येथील बाजार समिती निवडणूकीत (APMC Election) निलंग्यात व औराद शाहजानीत १८ पैकी १८ व देवणीत १८ पैकी १६ जागा निवडून आणत अरविंद निलंगेकर यांच्या परीवर्तन पॅनलने मोठा विजय मिळवला. (Latur) तिन्ही बाजार समितीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात निलंगेकर यांच्या नियोजनाची चर्चा सुरू आहे.

बाजार समितीच्या निकालानंतर अरविंद पाटील पहिल्यांदाच निलंग्यात आले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी स्वागताची जय्यत तयारी केली होती. (Bjp) निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ येथील युवा मोर्चाच्या पदाधिका-यांनी अरविंद पाटील निलंगेकर यांचा क्रेनच्या सहाय्याने तब्बल तीनशे किलोचा हार घालत त्यांचे स्वागत केले. वाजत गाजत त्यांच्या निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

दरम्यान, बाजार समिती निवडणुकीत मतदारांनी विश्वास ठेवत मोठा कौल दिला आहे. कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करून ही निवडणूक जिंकली. मात्र आता हुरळून जायचं नाही, लवकरच नगरपालीका, नगरपंचायती, जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणूका जाहीर होतील.

त्यामुळे निलंगा, देवणी व शिरूरअनंतपाळ तालुक्यातील सर्वच जिल्हापरिषद व पंचायत समीतीवर भाजपाचा झेंडा फडकावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. कार्यकर्त्यांनी आता उत्साहाने या निवडणूकीच्या तयारीला लागावे, शिवाय राज्य शासन व केंद्र शासनाने जाहीर केलेल्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोंहचण्यासाठी काम करावे, असे अवाहन निलंगेकर यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in