Latur : अधिवेशन संपता संपता अमित देशमुखांकडून मंत्र्यांच्या भेटीगाठी..

Amit Deshmukh : आज त्यांनी लातूर शहरातील विविध प्रश्नांसाठी सार्वजनिक बांधकाम, उद्योगमंत्र्यांची भेट घेतली.
Mla Amit Deshmukh In Winter Session News, Aurangabad
Mla Amit Deshmukh In Winter Session News, AurangabadSarkarnama

Marathwada Political News : नागपूर करारानूसार हिवाळी अधिवेशन दोन महिने चालवले पाहिजे, अशी मागणी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत केली होती. परंतु यंदाचे अधिवेशन (Winter Session) दोन आठवड्यातच गुंडाळण्यात आले. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील चौथ्या दिवशी देखील गदारोळ आणि मंत्र्यांच्या राजीमाच्या मागणीनेच गाजला.

Mla Amit Deshmukh In Winter Session News, Aurangabad
Beed News : डॉ. ज्योती कोड्यात बोलल्या, पण सांगून गेल्या मेटेंचे स्वप्न..

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेण्याचा मुळ उद्देश विदर्भ आणि (Marathwada) मराठवाड्यातील प्रश्नानां वाचा फोडणे आणि ते सोवडवणे हा होता. यंदाच्या अधिवेशानात मात्र त्याला सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी हरताळ फासण्यात आला. त्यामुळे मराठवाड्यातून आपले प्रश्न मांडण्यासाठी मोठ्या आशेने गेलेल्या आमदारांच्या पदरी निराशा आली. लातूर शहरचे आमदार तथा माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांची मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन संपता संपता पळापळ झाली.

आज त्यांनी लातूर शहरातील विविध प्रश्नांसाठी सार्वजनिक बांधकाम, उद्योगमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत लातूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत उभारणीसाठी तसेच नियोजित बाह्यवळण रस्त्याच्या निधी व शहरातील जुने शासकीय गोदाम यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन मागण्या सादर केल्या.

तसेच लातूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या उर्वरीत जमीनीचे त्वरीत अधिगृहण करून विमानसेवा सुरू करण्यात यावी. या परिसरातील वृक्ष लागवड केलेल्या आरक्षित भूखंडाचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी खुला करावा, आदी मागण्यांचे निवेदन उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन दिले. आता हे विषय कधी मार्गी लागतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com