Lasur Station APMC Election : बंब यांचे मिशन फत्ते ; सभापती, उपसभापती बिनविरोध..

Bjp : निवडणुकीत बंब आणि प्रा. बोरनारे यांच्या युतीने १४ जागांसह बहुमत मिळवले होते.
Lasur Station APMC Election, News
Lasur Station APMC Election, NewsSarkarnama

Marathwada : लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Lasur Station APMC Election) सभापतीपदी शेषरावनाना जाधव तर उपसभापतीपदी अनिल पाटील चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत आमदार प्रशांत बंब व आमदार प्रा.रमेश बोरनारे यांच्या पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले होते. तरीही आमदार प्रशांत बंब यांनी काळजी घेत सर्व चौदा संचालकांना सुरक्षित ठेवले. त्यामुळे फोडाफोडी होणार या चर्चा अफवाच ठरल्या.

Lasur Station APMC Election, News
Chhatrapati Sambhajinagar APMC : विरोधकांकडून आरोप, तरी सभपती पदासाठी बागडेंचा पठाडेंवरच विश्वास..

बंब (Prashant Bamb) यांनी सभापती व उपसभापती यांचे नामनिर्देश फॉर्म भरण्यासाठी त्यांच्या संपर्क कार्यालयापासून ते बाजार समितीच्या कार्यालयापर्यंत या सर्व संचालकांना पायी घेऊन गेले. (Bjp) दुपारी बाजार समितीच्या सभागृहात प्रशासक किरण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या उपस्थितीत नवीन सभापती व उपसभापती निवडीसाठी विशेष बैठकीचे घेण्यात आली.

बंब यांचे विश्वासू व अनुभवी माळीवाडगावच्या शेषरावनाना जाधव यांनी सभापतीपदासाठी अर्ज भरला. तर शिवसेना शिंदेगटातील आमदार प्रा. रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्या संचालकातून काटेपिंपळगाव येथील अनिल पाटील चव्हाण यांनी उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. बंब आणि बोरणारे यांच्या आदेशाने सभापती व उपसभापतीपदासाठी समन्वयाने नावे घोषित करण्यात आली होती.

निवडणूक निर्णय अधिकारी किरण चौधरी यांनी सभापतीपदी शेषरावनाना जाधव तर उपसभापती पदी अनिल चव्हाण यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. बाजार समिती निवडणुकीत बंब आणि प्रा. बोरनारे यांच्या युतीने १४ जागांसह बहुमत मिळवले होते. तर ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगांवकर व राष्ट्रवादीच्या शिवशाही पॅनलला फक्त दोन जागा जिंकता आल्या. काॅंग्रसेने स्वतंत्र पॅनल उभे केले होते, मात्र त्यांना खातेही उघडता आले नाही. तर दोन अपक्षांनीही निवडणुकीत विजय मिळवला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com