गुटखा प्रकरण : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सेना जिल्हाप्रमुखांना हटवले

आता लवकरच नव्या जिल्हाप्रमुखांची होणार घोषणा करण्यात येणार आहे.
गुटखा प्रकरण : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सेना जिल्हाप्रमुखांना हटवले
Cm Uddhav Thackeray

बीड - बीड पोलिसांनी गेल्या आठवड्यात बीड जवळील इमामपूर रस्त्यावरील एका गोदामात छापा टाकून ३२ लाखांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह चौघांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेची दखल घेत थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

उद्धव ठाकरे यांनी बीडच्या शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना पदावरुन हटवण्याचे आदेश जारी केले आहेत. आता लवकरच नव्या जिल्हाप्रमुखांची होणार घोषणा करण्यात येणार आहे. महिनाभरापूर्वीच शिवसेनेतीलच एका गटाने कुंडलिक खांडे यांच्याविरुध्द पक्ष नेत्यांसमोर खांडेंच्या कारभाराच्या तक्रारी केल्या होत्या. खांडेंचा अवैध धंद्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याशिवाय यापूर्वीही गुटख्यासह अन्य अवैध प्रकरणामध्ये त्यांचे नाव आल्याने त्यांच्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी पक्षातील काही पदाधिकार्‍यांनी श्रेष्ठींकडे केली होती. त्यानंतर आता पक्षश्रेष्ठींना खांडेवर कारवाई करत त्यांना पदावरुन हटवले आहे.

Cm Uddhav Thackeray
आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो ; मलिकांच्या टि्वटला वानखेडेंचे प्रत्युत्तर

वाचा, नक्की काय आहे प्रकरण-

गेल्या आठवड्यात बीड पोलिसांनी इमामपूर रस्त्यावरील गोदामावर छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेचे नाव समोर आले. त्यानंतर बीड पोलिसांनी खांडे यांच्यासह चौघांविरुध्द गुन्हे दाखल केले.

प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी मंगळवारी (१७ नोव्हेंबर) रात्री उशिरा इमामपूर रस्त्यावरील गोदामावर छापा टाकला होता. त्याठिकाणी विक्रीसाठी बंदी असलेल्या विविध प्रकारच्या गुटख्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी राज्यात गुटखा बंदी असतानाही त्याचा साठा करुन विक्री व वाहतूक करणे. सुगंधित सुपारी, तंबाखू मिश्रीत गुटखा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह चौघांविरुध्द गुन्हा दाखल करत पोलिसांनी एकाला अटक केली. खांडेंचं हे प्रकरण बाहेर येताच उद्धव ठाकरे यांनीही खांडेना पदावरुन हटवले असून या जागेवर आता नव्या जिल्हाप्रमुखांची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in