नगरपालिकेसाठी क्षीरसागरांनी कंबर कसली, मेटेंची शिवसंग्राम अजूनही स्वस्थच..

(Beed Municipal Election)नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरसेवक पदांच्या त्यांच्या उमेदवारांच्या मतांची गिणती अनेक ठिकाणी ‘शेवटून पहिले’अशी राहीली.
Mla Vinayak Mete, Shivsangram
Mla Vinayak Mete, Shivsangramsarkarnama

बीड : नगर पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी येत्या काही महिन्यांत निवडणुका निश्चित आहेत. पालिका व विधानसभेतील सत्ताधारी क्षीरसागरांनी सत्तेसाठी जोर लावला आहे. (Kshirsagar worked hard for the municipality, Mete's Shiv Sangram is still Slowly) मात्र, क्षीरसागरांचे कट्टर विरोधक म्हणवून घेणारी शिवसंग्राम मात्र पालिका क्षेत्रात बिनघोर दिसत आहे.

मागच्या निवडणुकीत सपाटून मार खाऊनही स्थानिक पातळीवर पक्षाची बांधणी, कार्यकर्त्यांची जोडणी व निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची फारशी तयारी दिसत नाही. (Beed Municipal Coropration Election) अगोदर भाजप, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस व आता पुन्हा भाजपसोबत असलेल्या विनायक मेटे यांनी सात वर्षांपूर्वीपर्यंत स्थानिक राजकारणात फारसे लक्ष घातलेले नव्हते.

एखाद दुसऱ्या समर्थकांना उमेदवारी मिळवून त्या पक्षाच्या चिन्हावर निवडणुक लढविली जाई. (Shivsangram Mla Vinayak Mete,Beed) मात्र, २०१४ साली सुरुवातीला शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी स्वत: बीड मतदार संघातून विधानसभेची निवडणुक लढविली. अपयश आले असले तरी निकराची लढत देण्यात ते यशस्वी ठरले.

Mla Vinayak Mete, Shivsangram
पवारच पाठीशी नसल्यामुळे मुश्रीफांची तब्येत बिघडली असावी

त्यामुळे त्यांच्यातील स्थानिक पातळीवरील संघटनाबाबत व निवडणुक लढविण्याबाबत विश्वास बळावला. त्यानंतर २०१७ सालच्या नगर पालिका निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या मोठ्या भावाने त्यांना एकटे पाडले. मात्र, तरीही जनतेतून नगराध्यक्षांच्या निवडणुकीत त्यांनी बीड पालिकेची निवडणुक लढविली. मात्र, नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरसेवक पदांच्या त्यांच्या उमेदवारांच्या मतांची गिणती अनेक ठिकाणी ‘शेवटून पहिले’अशी राहीली.

उमेदवार शोधावे लागणार..

आता पाच वर्षांचा कालखंड उलटून नवी निवडणुक होत आहे. मात्र, बिंदुसरा पुलाखालून केवळ पाणीच वाहून गेले आहे. या काळात शहरासाठी काही आंदोलने केली असली तरी त्यातील सातत्य, त्याला आलेले यश बीडकरांच्या विस्मृतीत गेले आहे. ५० नगरसेवकांच्या पालिकेत सक्षम व प्रत्येक विभागांतील उमेदवार शोधण्याचीही कसरत शिवसंग्रामला करावी लागणार आहे.

तसेच दोन्ही क्षीरसागरांशी लढण्यासाठी उमेदवारांची क्षमता आणि त्याला टॉनिक पक्षाला पुरवावे लागणार आहे. तेवढी रसद गोळा करत टॉनिक पचविणारे उमेदवारही आतापासून पाहिले तर किमान सगळ्या जागा तरी जिंकता येतील. कारण, त्यांचा मित्रपक्ष भाजप त्यांच्याशी कधी युती करणार नाही, आणि केली तरी भाजपची ताकदही त्यांच्यापेक्षा फार काही नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com