Kishori Pednekar News : शिवसैनिकांच्या अश्रूंची किंमत भाजपला चुकवावी लागेल..

Chhatrapati Sambhajinagar : मिंधे गटाचा एकही आमदार निवडून येणार नाही याची काळजी घेणे आपले सर्वांचे दायित्व आहे.
Kishori Pednekar News
Kishori Pednekar NewsSarkarnama

Shivgarjana : महाराष्ट्रमध्ये शिवसेनेची (Shivsena) करंगळी धरून भाजप चालत येऊन वाढली आणि आमच्या मानगुटीवर येऊन बसली. आमच्यातच फाटाफूट करून स्वतःचा फायदा करून घेतला. असंख्य शिवसैनिकांच्या अश्रूंचा मोबदला हा भाजपला आगामी काळात चुकवावा लागेल, असा इशारा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला.

Kishori Pednekar News
Imtiaz Jalil News : बाळासाहेब ठाकरेंना राजकीय दुकान चालवायचे होते, म्हणून शहराचे नाव बदलले..

फुलंब्री येथे शिवगर्जना अभियानात त्या बोलत होत्या. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या की, पैशाने मातब्बर झालेल्यांना आता आगामी काळातील निवडणुकीत गाडावे लागणार आहे. जनता जनार्दन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभी असून आगामी काळात निवडणुकीत याचा परिणाम दिसून येणार आहे. संपूर्ण राजकारणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सारखा निर्मळ माणूस शोधूनही सापडणार नाही.

कोरोना काळात संपूर्ण महाराष्ट्राला एका कुटुंबाप्रमाणे सांभाळले. त्यामुळे जगभरातून सुमारे १६८ पुरस्कार तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात आले. हे भारतीय जनता पक्षाला सहन झाले नाही, त्यांनी आमच्याच सहकाऱ्यांना फोडून स्वतःचा पक्ष वाढवला आणि आम्हाला संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र आता आम्ही सहन करणार नाही, गद्दारांना आणि त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या महाशक्तीलाही आगामी काळातील निवडणुकीत पराभूत करणारच.

आम्ही मुठभर असलो तरी शेवटपर्यंत लढणार असून २०२४ ला आपली अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घराघरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करायचे आहे. मतदानाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आपल्याला निष्ठावान म्हणून उभे राहायचे आहे. ग्रामीण भागातील लोकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या कामाची माहिती देणे गरजेचे आहे.

आगामी काळात मिंधे गटाचा एकही आमदार निवडून येणार नाही याची काळजी घेणे आपले सर्वांचे दायित्व आहे. प्रत्येक संकटाला ढालीप्रमाणे छातीवर घेऊन आगामी काळातील निवडणुकीला सामोरे जाऊन उद्धव ठाकरे यांचे हात आपल्याला बळकट करायचे आहे. यात भाजपही कशी नाॅटरीचेबल राहील याचाही बंदोबस्त आपण करणार आहोत. आपल्याला संघर्ष नक्कीच आहे पण आगामी काळातील लोकप्रतिनिधी हे आपल्या हक्काचे असतील असेही पेडणकर म्हणाल्या.

Kishori Pednekar News
अबकारी धोरण अंगलट आले अन् मनिष सिसोदिया सीबीआयच्या जाळ्यात अडकले

शिवसेनेचा जन्म हा सत्तेसाठी झाला नसून शिवसेनेचा जन्म हा केवळ संघर्षासाठी झाला आहे. मशालीने शिवसेनेचा पहिला खासदार यापूर्वीही निवडून दिलेला आहे. त्यामुळे शिवगर्जना अभियान महाराष्ट्रावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांसाठीचे आहे. 20 टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हे ब्रीदवाक्य घेऊन आपण काम करत आहोत. पदाधिकाऱ्यांनी गावागावात, घराघरात जाऊन पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य शिवसैनिकापर्यंत पोहोचवावे. शिवसैनिकांना प्रेरणा देण्यासाठी आज शिवगर्जना मेळावा आयोजित केले असल्याचे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in