सोमय्यांचं मुंडेंना खुलं आव्हान; ८३ कोटींचा हिशोब द्या!

एका मृत व्यक्तीचा अंगठा घेऊन तर काही देवस्थानच्या जमीनी घेतल्याचा आरोपही सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला.
Kirit Somaiya

Kirit Somaiya

sarkarnama

बीड : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी संत जगमित्र साखर कारखान्यासाठी (ता. अंबाजोगाई) शेतकऱ्यांकडून भागभांडवल म्हणून ८३ कोटी रुपये जमा केले. १० वर्षे झाली त्या जागेत एकही दगड लागला नाही, त्यासाठी जमा केलेल्या पैश्याचे काय झाले, असा सवाल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला.

<div class="paragraphs"><p>Kirit Somaiya</p></div>
धमक्यांनंतर किरीट सोमय्यांना पोलिसांची नोटीस

धनंजय मुंडे सत्तेत असल्याने राज्य सरकार या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करणार का, लोकांची फसवणूक करून यासाठी जागा प्राप्त केल्या. त्यात एका मृत व्यक्तीचा अंगठा घेऊन तर काही देवस्थानच्या जमीनी घेतल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. मुंडे मुख्य प्रवर्तक असलेल्या पुस येथील संत जगमित्र कारखान्याला मयत व्यक्तीचा अंगठा घेऊन जमिन घेतल्याचा गंभीर आरोप करत सोमय्या यांनी बुधवारी (ता. १५) मंबईत सक्त वसूली संचालनालय (ईडी) यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर ते गुरुवारी अंबाजोगाईमध्ये आले होते. त्यांनी सुरुवातीला कारखाना परिसरात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच या प्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या बर्दापूर पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली. त्यानंतर त्यांनी अंबाजोगाईत माध्यमांशी संवाद साधला.

सोमय्या म्हणाले, दहा वर्षापुर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही चौकशी का होत नाही, हा प्रश्न बर्दापूर पोलिसांना विचारला असता आमच्याकडे आदेश नसल्याचे सांगतात. याबाबत निष्पक्ष चौकशी होण्यासाठी राज्य सरकार काय करणार हे स्पष्ट करावे व ८३ कोटीचे भागभांडवल कुठे गेले याचीही माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावी. आपण यासाठी इडीची भेट घेऊन तक्रार केली आहे. आता दिल्लीतील इडीच्या मुख्यालयात तक्रार करणार असल्याचेही सोमय्या म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Kirit Somaiya</p></div>
किरीट सोमय्या आता धनंजय मुंडेविरुद्ध आक्रमक

या वेळी भाजप सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्याबाबतही पत्रकारांनी प्रश्न विचारले, तेंव्हा ते सिध्द झाले नाही. तुम्ही २४ महिने झाले सत्तेत आहात, तुम्ही चौकशी करा असे उत्तर सोमय्या यांनी दिले. या वेळी आमदार नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, नंदकिशोर मुंदडा, राम कुलकर्णी, निळकंठ चाटे, अच्युत गंगणे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com