किरीट सोमय्या आता धनंजय मुंडेविरुद्ध आक्रमक

ज्ञानोबा सिताराम कोळी यांचा मृत्यू सप्टेंबर १९८८ मध्येच झाला होता. मग २०१० मध्ये त्यांच्या अंगठ्याने मुंडेंनी जमीनीची खेरदी कशी केली? (Dhnanjay Munde,beed)
Somaiya-Munde
Somaiya-MundeSarkarnama

मुंबई ः भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंडे यांच्या मालकीच्या जगमित्र साखर कारखान्याची शंभर कोटींची जमीन त्यांनी फसवणुकीने बळकावल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. १९८८ मध्ये मरण पावलेल्या शेतकऱ्यांचा अंगठा घेऊन २०१० मध्ये त्याची जमीन मुंडेंनी आपल्या नावावर करून घेतली असल्याचा दावा सोमय्या यांनी करत काही कागपत्रे देखील पुरावे म्हणून सादर केली.

धनंजय मुंडे यांची तात्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. मुंबई येथे भाजप कार्यालयात सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकार व त्यामधील मंत्री अनिल परब, धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळातून ताबडतोब काढून टाकण्याची मागणी केली.

किरीट सोमय्या म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या मालकीच्या बीड येथील जगमित्र साखर कारखान्याच्या जमीन खरेदी घोटाळ्या संदर्भात फडणवीस सरकारच्या काळात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू करण्यात आली होती. परंतु मुंडे या चौकशीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर या चौकशीला तात्पुर्ती स्थिगिती देण्यात आली होती. परंतु नुकत्याच झालेल्या सुनावणी दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असे, म्हणत स्थगिती उठवली आहे.

१४ जुन २०१९ मध्ये आंबेजोगाई तालुक्यातील बरदापूर गावी राजाभाऊ फड यांनी धनंजय मुंडेसह अन्य १३ जणांविरुद्ध दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ४४ एकर २० गुंठे जमिन बेलकुड़ी बुवा मठ संस्थानाचे मठपती महंत रणजीत व्यकागिरी यांना निजाम काळात इनाम म्हणुन बहाल करण्यात आली होती. या जमिनीचे नोंद सरकारी जमिन अशी असून त्याचे मुळमालक ज्ञानोबा सिताराम कोळी हे होते.

धनंजय मुंडे यांनी २८/११/२०१० रोजी त्यांच्या संमती पत्राद्वारे ती खरेदी केल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु ज्ञानोबा सिताराम कोळी यांचा मृत्यू सप्टेंबर १९८८ मध्येच झाला होता. मग २०१० मध्ये त्यांच्या अंगठ्याने मुंडेंनी जमीनीची खेरदी कशी केली? असा सवाल देखील सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. मेलेल्या माणाचा अंगठा घेऊन जमीन हडपणारे समाजाचे काय कल्याण करणार, असा टोला देखील सोमय्या यांनी यावेळी लगावला.

Somaiya-Munde
मराठवाडा विद्यापीठात कोट्यवधींची अनियमितता; उच्च शिक्षणमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

त्यामुळे ज्ञानोबा सिताराम कोळी यांचा मृत्यू झालेला असताना त्यांच्या अंगठ्याचा ठसा लावून धनंजय मुंडे यांनी संमती पत्र घेतले याची चौकशी व्हायला हवी, इनाम देवस्थानची जमीन स्वतःचे जगमित्र शुगर या मीलच्या नावाने करून घेत शासनाची दिशाभूल व फसवणूक करण्यात आल्याचेही सोमय्या म्हणाले.

सदर जमीन ही वर्ग-२ असताना शासकीय कर्मचाऱ्यांशी संगनमत करून एन.ए. लेआऊट करून घेतले गेले. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. त्याआधी धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळातून काढा, अशी मागणी देखील सोमय्या यांनी केली असून पुढील आठवड्यात आपण बीडला या जागेची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com