Sanjay Raut : खोतकर दोन दिवसांपुर्वी मला म्हणाले, दानवेंना गाडल्याशिवाय राहणार नाही..

खोतकर स्वतः सांगत आहेत की मी अजूनही शिवसेनेतच आहे, तर मग या चर्चांना काही अर्थ उरत नाही. ( Sanjay Raut)
Sanjay Raut-Arjun Khotkar-Raosaheb Danve News
Sanjay Raut-Arjun Khotkar-Raosaheb Danve NewsSarkarnama

मुंबई : अर्जून खोतकर-दानवेंनी एकमेकांसोबत ब्रेकफास्ट केला, साखर भरवली, गुप्त भेट झाली या चर्चा कालपासून राज्यात आणि दिल्लीत सुरू आहे. (Shivsena) खोतकरांनी काल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची भेट घेतली. या भेटीनंतर खोतकर शिंदे गटात गेल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या.

एकीकडे दानवे म्हणतात आमचे मनोमिलन झाले, तर दुसरीकडे खोतकर सांगतात मी अजूनही शिवसेनेतच आहे. या सगळ्या गोंधळात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील खोतकर अजूनही शिवसेनेतच असल्याचा दावा प्रसार माध्यमांशी बोलतांना केला.

राऊत म्हणाले, दोन दिवसांपुर्वी माझी आणि खोतकरांची फोनवरून चर्चा झाली. तेव्हा ते मला म्हणाले होते, लोकसभा निवडणुक लढवणार आणि रावसाहेब दानवे यांना पराभूत करणार. दानवेंना गाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, त्यांना कायमचा घरी बसवेन. याशिवाय त्यांनी दानवेंबद्दल जे शब्द वापरले ते तुम्हाला सांगता येणार नाही.

खोतकर स्वतः सांगत आहेत की मी अजूनही शिवसेनेतच आहे, तर मग या चर्चांना काही अर्थ उरत नाही. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद दौऱ्यात आणि शिवसेनेच्या व्यासपीठावर राऊत यांनी जी भाषणं केली ती तुम्ही ऐकली तर ते किती कट्टर आणि विश्वासू आहेत हे लक्षात येईल. शिंदे-दानवेंची भेट त्यांनी वैक्तिक कामसाठी घेतल्याचे ते सांगत आहेत.

Sanjay Raut-Arjun Khotkar-Raosaheb Danve News
लिहून घ्या, शिवसेना मुबंई महापालिकेत पराभूत होणार; मुनगंटीवारांचा दावा

शिवसेने संदर्भात जर त्यांचे काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील. पण ते शिवसेना सोडतली असे मला तरी वाटत नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. जे मर्द मावळे आहेत, ते शिवसेनेचे उद्धव ठाकरेंसोबत आहेत, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com