खतगावकर आले, अजूनही बरेच येणार ; शंकररावांच्या काळातील काॅंग्रेस पुन्हा उभारू

(Deglur-Biloli By Election) लोकांप्रती समर्पित भाव असलेल्या कुटुंबातील जितेशला निवडून देणे हीच रावसाहेब अंतापूरकर यांना श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन देखील चव्हाण यांनी केले.
Ashok Chavan-Bhaskrrao Khatgaonkar
Ashok Chavan-Bhaskrrao KhatgaonkarSarkarnama

नांदेड ः भाजपमध्ये गेलेल्या अनेकांना आता पश्चातप होतोय, त्यामुळे ते पुन्हा काॅंग्रेसकडे वळत आहेत. कालच भास्करराव खतगावकर आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी काॅंग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला. मी त्यांचे स्वागत केले, अजूनही दहा-बारा लोक पक्षात येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे शंकरराव चव्हाणाच्या काळात जशी काॅंग्रेस जिल्ह्यात मजबुत होती, तशीच पुन्हा करू आणि या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधू, असा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्राचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. अशोक चव्हाण म्हणाले, भावनेच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकतात. लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला, केंद्रांत बदल करून आपण काय साध्य केले. आज गॅस, पेट्रोल, डिझेलचे भाव कुठे गेले पहा?

गॅस हजार रुपयांवर तर पेट्रोल-डिझेलने केव्हाच शंभरी पार केली आहे. सामान्यांच्या खिशात आता शंभर रुपयांची नोट दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा ती चूक करू नका. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जितेश अंतापूरकरला निवडून द्या, विरोधी पक्षाच्या उमेदवाराला निवडून देऊन काय उपयोग? जिल्ह्यात आपण कोट्यावधींची विकासकामे करत आहोत.

रावसाहेब अंतापूरकर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनामध्ये देखील लोकांची सेवा केली. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशा लोकांप्रती समर्पित भाव असलेल्या कुटुंबातील जितेशला निवडून देणे हीच रावसाहेब अंतापूरकर यांना श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन देखील चव्हाण यांनी केले.

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करत आहे. कोरोना, अतिवृष्टी, पूर अशा संकटात खंभीरपणे हे सरकार सामान्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी या सरकारने निधी कमी पडू दिला नाही. आता अतिवृष्टी, पूरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील हेक्टरी १० हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ashok Chavan-Bhaskrrao Khatgaonkar
आपल्याविरोधात मुंदडांनी पैसे वाटले! हेमंत पाटलांच्या आरोपाने शिवसेनेत खळबळ

त्यामुळे या सरकारची ताकद वाढवण्यासाठी जितेशला विजयी करा, अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. केवळ शिव्या देऊन मतदान मागणाऱ्यांच्या मागे जाण्याची चूक करू नका, असे आवाहन देखील चव्हाण यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com