Manipur : शिवसेना खाते उघडणार म्हणणारे खैरे आता म्हणतात भाजपने पैसे वाटले..

२०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने या पाचही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप केले आहे. (Chandrakant Khaire)
Shivsena Leader Chandrakant Khaire
Shivsena Leader Chandrakant KhaireSarkarnama

औरंगाबाद : देशाबाहेर पक्षाचा विस्तार वाढवण्याच्या दृष्टीने नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूरमध्ये उमेदवार उभे केले होते. पण या तीन्ही राज्यात शिवसेनेचे (Shivsena) डिपाॅझीट जप्त झाले. मणिूपरमध्ये शिवसेनेने ११ जागा लढवल्या होत्या. मराठवाड्यातील शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर काही मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. (Marathwada)

निवडणूक निकालाच्या दोन दिवसांनी खैरे यांनी यावर भाष्य केले. प्रचारा दरम्यान, देशाबाहेर मणीपूरमध्ये शिवसेना खाते उघडले असा दावा खैरेंनी केला होता. मात्र आता भाजपने वारेमाप पैसा वाटल्यामुळे आम्हाला यश मिळाले नाही, अशी सारवासारव त्यांनी केली आहे. पाच पैकी चार राज्यातील विजयाने भाजपची छप्पन इंचाची छाती आता आणखी फुगली असेल, असा टोला देखील खैरेंनी लगावला.

पाच राज्यातील निकाल जाहीर झाल्यानंतर मणीपूरध्ये काही मतदारसंघात जाऊन प्रचार केलेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यांशी संपर्क साधला, तेव्हा माहिती आली की तुम्हाला कळवतो, असे उत्तर त्यांनी दिली. माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा, विधानसभेतील दोनवेळ आमदार आणि सभापती राहिलेल्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाला खाते उघडण्याची अशा होती. मणिपूरमध्ये ११ मतदारसंघात शिवसेनेने उमदेवार उभे केले होते.

शिवसेनेचे अनिल देसाई, यांच्यासह चंद्रकांत खैरे व अन्य काही नेत्यांवर या राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. शेवटच्या टप्यात खैरे तीन दिवस इंफाळमध्ये होते. यावेळी त्यांनी काॅर्नर सभा, पदयात्रा व स्तंभपूजन करत प्रचार केला होता. अकरा पैकी दोन उमेदवार निवडून येऊ शकतील असा विश्वास खैर यांनी सरकारनामाशी बोलतांना व्यक्त केला होता.

लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा, दोनवेळा आमदार राहिलेल भाजपचे नेते पक्षात आल्याने विजयाची खात्री असल्याचे खैरे यांनी तेव्हा सांगितले होते. प्रत्यक्षात मतदान आणि मतमोजणीनंतर शिवसेनेने लढवलेल्या सगळ्या अकरा जागांवर पक्षाचे डिपाॅझीट जप्त झाल्याचे समजते.

Shivsena Leader Chandrakant Khaire
125 तासांच्या रेकॉर्डिंगशिवाय आणखी पुरावे; फडणवीसांचा गौप्यस्फोट

या संदर्भात खैरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, माझ्याकडे अद्याप आकडेवारी आलेली नाही, पण भाजपने वारेमाप पैशाचे वाटप केल्यामुळेच आम्हाला यश मिळू शकले नाही. २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने या पाचही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप केले आहे. चार राज्यात सत्ता आल्यामुळे आता त्यांची छाती आणखी फुगली असले, पण आम्ही यापुढेही बाहेरच्या राज्यांमध्ये निवडणुका लढवू आणि प्रयत्न करत राहू, असेही खैरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in