Khaire : शिंदे यांनी यापुर्वीच गद्दारीचा प्रयत्न केला होता, तेच काॅंग्रेससोबत जाण्यास आतूर होते..

गद्दारी एकनाथ शिंदे यांनी केली आहे ती, यापूर्वी सुद्धा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. शिवसेनेचे पंधरा आमदार सोबत घेऊन काँग्रेसमध्ये जाण्यासाठी शिंदे यांनी खूप प्रयत्न केला होता. (Chandrakant Khaire)
Cm Eknath Shinde-Chandrakant Khaire News, Aurangabad
Cm Eknath Shinde-Chandrakant Khaire News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : राज्यातील सत्तांतरानंतर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे. ज्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून ठाकरेंची सत्ता घालवली ते शिंदे काॅंग्रेस-आघाडीचे सरकार आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांनाच बंडाच्या तयारीत होते, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी (Eknath Shinde) एकनाथ शिंदे पंधरा आमदार घेऊन आमच्याकडे आले होते या दाव्याला बळकटी मिळाली आहे.

काॅंग्रेसचे माजी मंत्री आमदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात खळबळजनक दावा केला होता. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. (Maharashtra) चव्हाणांच्या आरोपाला शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दुजोरा देत एकनाथ शिंदे यांनी पंधरा आमदारांना सोबत घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली होती, असे स्पष्ट केले आहे.

परंतु मातोश्रीवर याची कुणकुण लागली आणि शिंदे यांना माघारी बोलावण्यात आल्यामुळे तेव्हा शिंदे यांचे बंड फसले, असेही खैरे म्हणाले. काल अशोक चव्हाण यांनी शिवसेना आणि भाजपची युती असताना एकनाथ शिंदे एक शिष्टमंडळ घेऊन आले होते. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी सत्तास्थापन करण्याचा प्रस्ताव दिला असल्याचा गौप्यस्फोट केला होता.

त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यापुर्वी देखील एकनाथ शिंदे काॅंग्रेसमध्ये जाणार होते, असा दावा केला होता. चव्हाण यांच्या आरोपानंतर आज पुन्हा खैरेंनी याचा पुनरुच्चार केला.

Cm Eknath Shinde-Chandrakant Khaire News, Aurangabad
अशोक चव्हाणांची क्लिप जाहीर केली तर अडचण होईल : शेलारांचा गंभीर इशारा!

खैरे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना आम्हाला काँग्रेसमध्ये यायचं म्हणून एकनाथ शिंदे त्यांचे मागे लागले होते. जी गद्दारी एकनाथ शिंदे यांनी केली आहे ती, यापूर्वी सुद्धा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. शिवसेनेचे पंधरा आमदार सोबत घेऊन काँग्रेसमध्ये जाण्यासाठी शिंदे यांनी खूप प्रयत्न केला होता.

मात्र याबाबत शिवसेनेच्या काही नेत्यांना कुणकुण लागल्याने तो विषय थांबला होता. त्यामुळे आम्हाला तुम्ही काँग्रेससोबत गेलात अस म्हणणारे शिंदेच काँग्रेससोबत जाण्यास आतूर होते,असा टोलाही खैरे यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com