Khaire : आता फोटोला जोडे मारले, पुन्हा ठाकरे कुटुंबाबद्दल बोलाल तर प्रत्यक्षात मारू..

शिवसैनिक प्रचंड चिडलेले आहेत, ते या कदमांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. (Chandrakant Khaire)
Shivsena Leader Chandrkant Khaire  Warn Ramdas kadam News, Aurangabad
Shivsena Leader Chandrkant Khaire Warn Ramdas kadam News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माॅसाहेब मीनाताई ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द काढले. या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून आज राज्यभरात रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या फोटोला जोडे मारण्याचे आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी कदम यांना इशारा दिला, की आज तुमच्या फोटोला जोडे मारले, पण यापुढे ठाकरे कुटुंबाबद्दल अपशब्द काढाल तर तुम्हाला प्रत्यक्षात जोडे मारू.

ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला मंत्री केले, ज्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला मंत्री केले, त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीबद्दल वाईट बोलतांना तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. रामदास कदम यांचा मेंदू सडला आहे, अशी घणाघाती टीका देखील खैरे यांनी केली. रामदास कदम यांनी केलेली वादग्रस्त विधानानंतर (Shivsena) शिवसेना रस्त्यावर उतरली आहे.

औरंगाबादेत कदम यांच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तत्पुर्वी चंद्रकांत खैरे यांनी रामदास कदम यांना खडेबोल सुनावले. खैरे म्हणाले, रामदास कदम यांना बाळासाहेबांनी, उद्धवसाहेबांनी दोनदा मंत्री केले. आधी अन्न व पुरवठा राज्यमंत्री, गृहराज्यमंत्री आणि नंतर वने व पर्यावरण मंत्री. पण या काळात कदम यांनी रेशन दुकानांवर तपासण्या करून भ्रष्टाचार केला.

पर्यावरण मंत्री असतांना आमच्या शहरात अनेक उद्योजकांना त्रास दिला. त्यांना नोटीसी पाठवून त्यांचे उद्योग बंद पाडण्याचे काम केले. पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना नेहमी घालून पाडून बोलायचे. आता तर ते ठाकरे कुटुंबाबवरच टीका करू लागलेत. रामदास कदम यांना आम्ही भाई म्हणायचो.

Shivsena Leader Chandrkant Khaire  Warn Ramdas kadam News, Aurangabad
Shivsena : गोळीबार, तंगड्या तोडण्याची भाषा करणाऱ्यांना आमदारांना सरकारचे सरंक्षण...

आजही भाईच म्हणतो, पण ठाकरे कुटुंबावर बोलतांना त्यांना लाज वाटायला पाहिजे. त्यांच्या मेंदू सडला आहे का? आता त्यांच्या फोटोला जोडे मारले, पण प्रत्यक्षात जोडे मारण्याची वेळ त्यांनी आणू नये, असा माझा त्यांना सल्ला आहे. शिवसैनिक प्रचंड चिडलेले आहेत, ते या कदमांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील खैरे यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com