खैरे मला संज्या म्हणाले, पण मी त्यांना `चंद्या`, म्हणणार नाही, वयाचा मान राखीन..

शिंदे यांचा दाढीवाला तर शिरसाट यांचा `संज्या`, असा उल्लेख करत खैरे बरसले होते. यावर आतापर्यंत गप्प असलेले शिरसाट शिंदे समर्थकांच्या एका बैठकीत बोललेच. (Mla Sanjay Shirsat)
Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khiare News Aurangabad
Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khiare News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बंडखोरांच्या मतदारसंघात झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिरसाट यांचा `संज्या` असा एकेरी उल्लेख करत खैरे यांनी त्यांच्यावर तोफ डागली होती. आता संजय शिरसाट यांनी या टीकेला उत्तर देतांना खैरे (Chandrakant Khiare) यांचा `चंद्या`, असा उल्लेख केला आहे.

पण हा उल्लेख करतांना शिरसाट यांनी चालाखी दाखवली असून खैरे यांच्या वयाचा मान राखून त्यांनी मला संज्या म्हटले असले तरी आपण त्यांना चंद्या म्हणणार नाही, असे म्हटले आहे. (Shivsena) शिवसेना विरुद्ध बंडखोर यांच्यात सध्या चांगलाच कलगितुरा रंगला आहे. सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई आणि त्यानंतर मतदारसंघात परतल्यानंतर शिरसाट यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते.

आपल्या संपर्क कार्यालयासमोर त्यांनी समर्थकांना उद्देशून केलेल्या भाषणात माझ्या नादाला लागाल तर तुमची अंडीपिल्ली बाहेर काढीन असा इशारा देत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांना सुनावले होते.

त्यानंतर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद मेळावा शिरसाट यांच्या मतदारसंघात पार पडला. या मेळाव्यात भाषण करतांना चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला होता.

Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khiare News Aurangabad
मुख्यमंत्र्यांचे स्वागत आणि शक्तीप्रदर्शन सत्तारांना मंत्रीपद मिळवून देणार ?

शिंदे यांचा दाढीवाला तर शिरसाट यांचा `संज्या`, असा उल्लेख करत खैरे बरसले होते. यावर आतापर्यंत गप्प असलेले शिरसाट शिंदे समर्थकांच्या एका बैठकीत बोललेच. त्यांनी खैरेंच्या त्या टीकेचा उल्लेख करत त्यांनी जरी मला संज्या म्हटले असले तरी मी त्यांच्या वयाचा मान राखत त्यांना चंद्या म्हणणार नाही, असा टोला लगावला. आता खैरे यावर काय प्रतिक्रिया देतात हे पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in