Khaire : न्यायदेवतेचा निर्णय मान्य, पण निवडणुक आयोगातही लढा देवू..

पक्षांतर बंदी कायद्यानूसार त्या १६ आमदारांना अपात्र ठरवावे ही मागणी शिवसेनेने केलेली आहे. आमच्यासाठी तो निकाल देखील महत्वाचा आहे. (Chandrakant Khaire, Shivsena)
Shivsena Leader Chandrakant Khaire News, Aurangabad
Shivsena Leader Chandrakant Khaire News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे सेना या वादात खरी शिवसेना व धनुष्यबाण कुणाचा याचा फैसला निवडणुक आयोगच करणार हे आता स्पष्ट झाले आहे. (Shivsena) या संदर्भात निवडणुक आयोगाने कार्यवाही करू नये, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. (Supreme Court) सर्वोच्च न्यायालयाने आता ही स्थगिती उठवत या संदर्भातील कार्यवाहीचा अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचे स्पष्ट केले आहे.

या निर्णयाचे वेगवेगळे अर्थ लावले जात असून शिंदे गटाला दिलासा तर उद्धव सेनेला दणका असे देखील या निर्णयाचे वर्णण केले जात आहे. निश्चित आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे डोळे लावून बसलेल्या शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व शिवसैनिकांचा यामुळे हिरमोड झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती उठवण्याच्या निर्णयावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी प्रतिक्रिया दिली.

न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे, आज त्यांनी दिलेला निर्णय मान्य करावाच लागेल. निवडणुक आयोगासमोरही आम्ही लढा देवू आणि जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खैरे म्हणाले, निवडणुक आयोगाने कार्यवाही करू नये, यावरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवली आहे. निवडणूक चिन्हा संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच आहे हे घटनापीठाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आता शिवसेना निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडेल. या संदर्भातील कागदपत्रे शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला सादर केली जातील. निवडणूक चिन्हा संदर्भातला एक विषय सुप्रीम कोर्टाने निकाली काढला आहे. परंतु १६ आमदारांच्या अपात्रते संदर्भातील याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही.

Shivsena Leader Chandrakant Khaire News, Aurangabad
Beed : जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलाॅग भरून काढण्यासाठी पंकजाताईंना पुन्हा पालकमंत्री पद मिळावं..

पक्षांतर बंदी कायद्यानूसार त्या १६ आमदारांना अपात्र ठरवावे ही मागणी शिवसेनेने केलेली आहे. आमच्यासाठी तो निकाल देखील महत्वाचा आहे, त्याकड देखील आम्ही लक्ष ठेवून आहोत. आम्हाला निश्चित न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. पक्ष फोडून गद्दारी करणाऱ्यांच्या विरोधातला आमचा लढा सर्वोच्च न्यायालयात सुरू आहेच, आता आम्ही निवडणूक आयोगापुढे देखील तो लढू आणि जिंकू याचा पुनरुच्चार देखील खैरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com