खैरेंना मुलाला मोठे करायचे आहे, माझा अडसर असल्याने हकालपट्टी ; जंजाळ यांचा आरोप

लोकसभा निवडणुकीत ज्यांनी खैरेंच्या विरोधात काम केले त्या अंबादास दानवेंच्या खांद्याला खांदा लावून आज खैरे फिरत आहेत. त्यावेळी करवाई केली असती तर खैरेंची खुर्ची आज मजबूत राहिली असती. (Shivsena)
Chandrakant Khiare-Rajendra Janjal News Aurangabad
Chandrakant Khiare-Rajendra Janjal News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : जिल्ह्यातील शिवसेना आपल्याच ताब्यात राहावी या अट्टाहासापोटी स्थानिक नेत्यांनीच शिवसेनेची वाट लावली. शिवसेना (Shivsena) नेते चंद्रकांत खैरे यांना मुलाला युवासेनेत मोठे करायचे आहे. त्यासाठी मी अडसर असल्याने आपली हकालपट्टी करण्यात आल्याचा आरोप राजेंद्र जंजाळ यांनी शनिवारी (ता. १६) केला.

जिल्ह्यातील पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत गेल्यानंतर शिवसेना पक्षातंर्गत पडझड सुरूच आहे. (Chandrakant Khaire) शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी गुरुवारी (ता. १४) मुंबईत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी (Yuvasena) युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ शिरसाट यांच्यासोबत होते. त्यामुळे त्यांची शुक्रवारी (ता. १५) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

त्यानंतर जंजाळ यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांच्यावर आरोप केले. युवासेनेत आपले खच्चीकरण सुरू होते. त्यामुळे वर्ष-दीडवर्षापासून आपण बाजूला होतो. शहरात शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले, मात्र मला निमंत्रण देण्यात आले नाही. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले, त्यावेळी मला बाजूला ठेवण्यात आले.

नुकतीच ठाकरे यांची औरंगाबादेत सभा झाली. त्यावेळी व्यासपीठावर माझी खुर्ची राखीव होती. पोलिसांकडे पासही तयार होता. पण पास मला मिळू दिला नाही, असा आरोप जंजाळ यांनी केली. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मीच ठेवला होता. तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडून पाच कोटीचा निधी आणला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा प्रस्ताव देखील मीच ठेवला होता.

Chandrakant Khiare-Rajendra Janjal News Aurangabad
मंत्री नसल्याचा आनंद, पण परळीशिवाय राज्यात कोणतीच घडामोड घडत नाही, ही आपली ताकद..

गेल्या १९ वर्षापासून पक्षाचे काम केले पण स्थानिक नेते खैरे, दानवे यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर वारंवार अन्याय केला. त्यांनीच शिवसेनेचे वाटोळे केले, असेही जंजाळ म्हणाले. युवासेनेचे शहरातील अनेक पदाधिकारी माझ्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला. माझ्यावर कारवाई करण्यासाठी खैरे यांना वारंवार मातोश्रीवर फोन करावा लागला. थयथयाट करावा लागला. युवा सेनेत ऋषीकेश खैरे यांच्यासाठी मी अडसर ठरेन हा आकस मनात ठेऊन खैरेंनी आपल्यावर कारवाई करण्यास भाग पाडले, असा आरोप जंजाळ यांनी केला.

शिरसाट यांच्या कार्यालयावर वॉचमनसारखा मी उभा होतो, असा आरोप खैरे यांनी माझ्यावर केला आहे. हो मी वॉचमन आहे पण हिंदुत्वाचा आहे. राजाबाजार येथील दंगलीत खैरे यांच्या पुतण्याचा जीव मी वाचवला हे खैरे विसरले का? खैरेंसोबत अनेकवेळस संघर्ष झाला. मी त्यांना खुले आव्हान दिले होते. त्यावेळी विमानतळातून तीन तास ते बाहेर आले नव्हते, असा दावाही जंजाळ यांनी केला.

महापालिका निवडणुकीत शहरातील कोणत्याही नगरसेवकापेक्षा जास्त मतांनी मी निवडून येणार. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी खैरेंच्या विरोधात काम केले त्या अंबादास दानवेंच्या खांद्याला खांदा लावून आज खैरे फिरत आहेत. त्यावेळी दानवेंवर करवाई केली असती तर खैरेंची खुर्ची आज मजबूत राहिली असती, अशी टीकाही जंजाळ यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com