शिरसाट बदमाशाची औलाद, केसरकर गद्दार ; शिवसेनेचं नावं घेण्याची तुमची लायकी नाही..

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सभा जर तेव्हा इथे झाली नसती तर केसरकरांचे त्याच वेळी विसर्जन झाले असते, असा टोला देखील राऊत यांनी यावेळी लगावला. (Mp Vinayak Raut)
Mp Vinayak Raut-Sanjay Shirsat-Dipak Kesarkar News
Mp Vinayak Raut-Sanjay Shirsat-Dipak Kesarkar NewsSarkarnama

मुंबई : जगेण तर शिवसेनेसाठी आणि मरेन तेही शिवसेनेसाठीच असा कणखर बाणा बाळगणारे शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत कुठे? तर सत्ता आणि मंत्रीपदासाठी गद्दारी करून बाहेर पडलेले संजय शिरसाट कुठे? संजय शिरसाट सारख्या बदमाशाची औलादा आमच्यात होती याचं वाईट वाटतं, अशा शब्दात खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्यावर हल्ला चढवला.

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. सिंधूदुर्ग येथील शिवसंवाद मेळाव्यात बोलतांना विनायक राऊत चांगेलच आक्रमक झाले होते. (Maharashtra) शिवेसना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर बंडखोर आमदारांकडून जो आनंद व्यक्त केला गेला, त्यावर राऊत यांनी शिंदेसेनेत गेलेल्या बंडखोरांचा समाचार घेतला.

विनायक राऊत म्हणाले, मंत्रीपदासाठी तुम्ही शिंदे गटात गेलात, शिवसेनेचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही. शिवसेनेचा नेता असावा तर संजय राऊत यांच्यासारखा असावा. जगेण तर शिवसेनेसाठी मरेन तेही शिवसेनेसाठी या त्यांच्या भूमिकेचा आम्हाला अभिमान आहे. आज आदीत्य ठाकरे कोकणात आले आहेत.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सभा जर तेव्हा इथे झाली नसती तर केसरकरांचे त्याच वेळी विसर्जन झाले असते, असा टोला देखील राऊत यांनी यावेळी लगावला. शिवसेनेत आलेल्या कालच्या केसरकरांना मंत्रीपद दिलं, सर्व दिलं पण ते गद्दार निघाले. या गद्दारांच्या औलादीला गाडल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही.

Mp Vinayak Raut-Sanjay Shirsat-Dipak Kesarkar News
Ashok Chavan : चर्चा कोण करतयं, असे म्हणत चव्हाणांकडून चिखलीकरांची खिल्ली..

आदित्य ठाकरे यांची आजची ही सभा म्हणजे उद्याच्या विजयाची सभा ठरेल, असा विश्वास देखील राऊत यांनी व्यक्त केला. चार घराची चव चाखून आलेला माणूस आज ठाकरे घराण्याला शिकवायला लागला, असा टोला देखील विनायक राऊत यांनी दिपक केसरकरांना लगावला. ज्या व्यक्तीचं बोट धरून हा राजकारणात आला त्या पवारांच्या तोंडालाही याने पाने पुसली.

शिवसेनेला फोडण्यासाठी पवारांना कसे काय जबाबदार धरता ? असा सवाल उपस्थीत करत संजय राऊत यांच्यावर काल ईडीने कारवाई केल्यानंतर आमदार संजय शिरसाट यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना आज शिंदेसोबत गेलेल्या सगळ्या आमदारांना आनंद होत असेल अशी प्रतिक्रिया दिली होती. यालाही राऊत यांनी उत्तर दिले. संजय शिरसाठ ही बदमाशाची औलाद आमच्यात होती याचे वाईट वाटते, अशी टीकाही त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in