Amarsinh Pandit On Kendrekar : केंद्रेकरांच्या सूचनेचे सर्वत्र कौतुक, पण अमरसिंह पंडित म्हणतात, दहा हजारच का ?

Ncp : शेतकऱ्यांना पेरणीसाठी १० हजार रुपये देण्याच्या मागणीवर `दया कुछ तो गडबड है`, म्हणत टीका केली.
Amarsinh Pandit On Kendrekar, News
Amarsinh Pandit On Kendrekar, NewsSarkarnama

Beed News : विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर (Sunil Kendrekar) यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलेल्या गोष्टींच्या अधारे पेरणीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजार रुपये देण्यात यावेत, अशी शिफारस राज्य सरकारकडे केली. केंद्रकरांच्या या शिफारशीचे सर्वत्र स्वागत आणि कौतुक होत असतांना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडीत यांनी मात्र त्यांच्यावर टीका केली आहे.

Amarsinh Pandit On Kendrekar, News
Mla Abhimanyu Pawar Gift To Carrier : वाढदिवस पालकमंत्र्यांचा, हमाल बांधवांना अपघात व विमा कवचाची भेट आमदारांकडून...

विभागीय आयुक्त या महत्वाच्या पदावर बसलेल्या केंद्रेकरांनी माध्यमांना जाहिररित्या सांगणे कितपत योग्य आहे? त्यांनी शासनाकडे शेतकऱ्यांसाठी दहा हजारच का? २५ हजारांची मागणी का केली नाही? असा सवाल देखील उपस्थीत केला आहे. केंद्रेकरांचा बोलवता धनी दुसरा कोणी आहे का? अशी शंका देखील पंडीत (Amarsinh Pandit) यांनी उपस्थितीत केली.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागील कारणे आणि त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी पाच ते सहा पानी अर्जाद्वारे सर्वेक्षण केले होते. (Affected Faremrs) या सर्वेक्षणाच्या अहवालातून काढलेल्या निष्कर्षानूसार त्यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीप हंगामाच्या पेरणीवेळी प्रत्येकी दहा हजारांची मदत दिली जावी, (Beed News) अशी शिफारस राज्य सरकारकडे केली.

अनेक राजकीय पक्ष, नेत्यांनी त्यांच्या या शिफारशीचे स्वागत केले. माजी मुख्यमंत्री काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारकडे केंद्रेकरांनी केलेली शिफारस योग्य असून ती मान्य करावी, असे ट्विट देखील केले. परंतु राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडीत यांनी मात्र केंद्रकर यांच्या शिफारशीबद्दल शंका उपस्थितीत केली.

शेतकऱ्यांना पेरणीसाठी १० हजार रुपये देण्याच्या मागणीवर `दया कुछ तो गडबड है`, म्हणत टीका केली. या भागातील शेतकरी अधिक अडचणीत असल्याने १० हजारच का, २५ हजारांची मागणी का केली नाही ? २७ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात एक उच्चपदस्थ अधिकारी अशा पद्धतीने सरकारला मी प्रस्ताव पाठविला आहे, असे जाहीररीत्या माध्यमांना सांगतो हा माझ्या पाहण्यातला पहिलाच प्रसंग असल्याचे पंडित म्हणाले.

Amarsinh Pandit On Kendrekar, News
Raosaheb Danve Watched The Kerala Story: चारशे महिलांसोबत दानवेंनी पाहिला `द केरळा स्टोरी`, सेल्फीही दिल्या..

मुळात एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने कर्तव्याचा भाग म्हणून सरकारकडे प्रस्ताव पाठविणे मी समजू शकतो, परंतु केंद्रेकरांनी पाठवलेल्या प्रस्तावावर ते जाहीररित्या माध्यमातून बोलतात हे विचार करण्यासारखे आहे. मग केंद्रकरांचा बोलवता धनी कोण ? असा सवालही पंडित यांनी केला. शेतकऱ्यांना खरंच मदत करायची होती तर मग हात आखडून मागणी का? आणि कुणाच्या सूचनेवरून केली.

१० हजार रुपयांचा प्रस्ताव पाठवला आणि शासनाने पाच हजार रुपये देण्याचे मान्य केले तर मग काय करणार? अशी गुगली देखील पंडित यांनी टाकली. मागताना किमान २५ हजार रुपये एकरी तरी मागायचे. तेलंगणाच्या धरतीवर द्यायचेच असतील तर मायबाप सरकारने २५ हजार रुपये तरी द्यावेत, असेही पंडित म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com