Beed News : काल पोलिस अधिक्षकांकडे तक्रार, आज करुणा शर्मा यांच्याविरोधातच परळीत गुन्हा दाखल..

Beed Politics : करुणा शर्मा,अजयकुमार देडे यांच्याविरोधात कलम 507, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Karuna Munde, News Beed
Karuna Munde, News BeedSarkarnama

Beed : करुणा शर्मा (मुंडे) यांनी काल धनंजय मुंडे यांचे नाव घेत आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार बीड पोलिस अधिक्षक कार्यालयात दाखल केली होती. त्यानंतर आज परळीत करुणा मुंडे (शर्मा) (Karuna Munde) यांच्या विरोधातच फेसबुक पोस्ट का टाकली? असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Karuna Munde, News Beed
Ambadas Danve : आमची युती परिवर्तन घडवेल ; भाजपने चिंता करू नये..

त्यामुळे पुन्हा एकदा करुणा व धनंजय मुंडे यांच्यातील संघर्ष भडकण्याची शक्यता आहे. करुणा मुंडे या काल (Beed) बीडमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी पोलिस अधिक्षकांकडे तक्रार देत आपल्याला राजकारण सोडून दे नाहीतर जिवंत जाळून टाकू अशा धमक्या धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) हे आपल्या कार्यकर्त्यांमार्फत देत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी करुणा मुंडे यांच्याच विरोधात परळी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळीच्या पंचवटीनगरातील बालाजी ज्ञानोबा दहिफळे यांनी करुणा शर्मा यांच्याविरुद्ध परळी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपुर्वी फेसबुकवर करुणा शर्मा यांनी एक पोस्ट केली. त्यांच्या या पोस्टवर मी कमेंट केली होती. मात्र त्यानंतर २२ जानेवारीला रात्री पावणे दहा वाजता करुणा शर्मा यांनी दहिफळेंना फोन करत तु माझ्या फेसबुक पोस्टवर कमेंट का केली म्हणून शिविगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

करुणा शर्मा यांच्या फोनवरुन अजयकुमार देडे यांनीही आपल्याला शिवीगाळ केली असल्याचं दहिफळे यांनी म्हटले आहे. या फिर्यादीनंतर करुणा शर्मा,अजयकुमार देडे यांच्याविरोधात कलम 507, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे कालच करुणा मुंडे यांनी आपल्याला फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार दिली होती. राजकारण सोडून दे, अन्यथा तुला जाळून जिवे मारून टाकू, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

आपल्या जिवाला धनंजय मुंडे, राजश्री मुंडे, तेजस ठक्कर, राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि बालाजी डोईफोडे यांच्यापासून धोका असल्याचे करुणा शर्मा यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवर कारवाई होण्याच्या आतच परळीत करुणा मुंडे शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यापुर्वी करुणा मुंडे यांच्यावर परळीत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्यांना तुरुंगात देखील जावे लागले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com