Kannad Political News : कन्नडमधून पाटील की जाधव ? सत्तार कोणाला बळ देणार?

Abdul Sttar : दानवे-सत्तार यांची राजकीय मैत्री पाहता सत्तार शेजार धर्म आणि युतीधर्म पाळतील आणि संजना यांना मदत करतील.
Kannad Political News
Kannad Political News Sarkarnama

Marathwada : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अकरा महिन्यांपुर्वी जे बंड झाले त्यावेळी जिल्ह्यातील पाच पैकी फक्त कन्नडचे ( Kannad Political News) आमदार उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते. त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यातील आमदारांना सोबत घेवून जाण्याचा शिंदे व त्यांच्या समर्थकांचा डाव फसला होता. तेव्हा साथ दिली नाही याचा वचपा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजपूत यांना पराभूत करून काढण्याच चंग शिंदे आणि त्यांच्या गटाने बांधला आहे. `शासन आपल्या दारी`, च्या निमित्ताने कन्नडमध्ये काल जंगी कार्यक्रम आणि त्याद्वारे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

Kannad Political News
Ambadas Danve News : शिंदे गटाला दोन जागा तरी मिळतात का ते बघूया; अंबादास दानवे दाबली दुखरी नस!

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा यामध्ये सर्वाधिक पुढाकार दिसून आला. नुकत्याच झालेल्या कन्नड बाजार समितीच्या निवडणुकी सत्तार यांनी बराच रस दाखवला होता. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना ताकद देत पॅनल उतरवले आणि बाजार समितीत सत्ताही मिळवली. सत्तार यांचे सुरुवातीपासूनच (Kannad) कन्नडवर विशेष लक्ष आहे. त्यांच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील सोयगांवचा काही भाग हा कन्नडमध्ये येतो.

बाजार समितीत सत्तार यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या कन्या माजी जिल्हा परिषद सदस्य संजना जाधव यांना देखील सोबत घेतले होते. दोघांनी मिळून बाजार समितीत सत्ता मिळवली. (Shivsena) पडद्यामागे सगळी सुत्र सत्तार यांनीच हलवली होती हे आता लपून राहिलेले नाही. नितीन पाटील यांच्या माध्यमातून सत्तार यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचा आमदार करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

बाजार समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांना थेट मुख्यमंत्र्यांना भेटायला घेवून गेल्यानंतर `शासन आपल्या दारी`, या योजनेसाठी कन्नड तालुक्याची निवड ही योगायोगाने झालेली नाही. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून अब्दुल सत्तार यांनी स्वतःचा मतदारसंघ तर मजबुत केलाच, पण त्या माध्यमातून ते जिल्ह्यात देखील आपली ताकद वाढवतांना दिसत आहेत. त्यासाठी आपल्या समर्थकांना बळ देण्याच्या दृष्टीने कन्नडमध्ये घडलेल्या घडामोडी बऱ्याच बोलक्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उदयसिंह राजपूत यांच्याविरोधात शिंदे गटाकडून सत्तार सांगतील तोच उमेदवार असणार एवढे मात्र निश्चित. नितीन पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेची सगळी सुत्र सत्तार यांनी आपल्या हाती ठेवली आहे. आता विधानसभेला त्यांना संधी देत तालुक्यावर देखील सत्तार वर्चस्व राखू पाहत आहेत. तर दुसरीकडे सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात मदत करणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या देखील नावाची चर्चा सुरू आहे.

Kannad Political News
Maharashtra Politic's : पाठीत खंजीर खूपसणाऱ्या गद्दारांसाठी शिवसेनेचे दरवाजे परत उघडले जाणार नाहीत : शिवसेना नेत्याने ठणकावले

शिंदे आणि भाजप यांची युती कायम राहिली आणि त्यांनी निवडणुक सोबत लढवली तर कन्नड मतदारसंघातून नितीन पाटील किंवा संजना जाधव या दोघांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. नितीन पाटील यांनी यापुर्वी काॅंग्रेसकडून या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. तर संजना जाधव यांच्या घरात यापुर्वी आमदारकी होती. परंतु आता त्या स्वतः आमदार होण्यास इच्छूक आहेत.

दानवे-सत्तार यांची राजकीय मैत्री पाहता सत्तार शेजार धर्म आणि युतीधर्म पाळतील आणि संजना जाधव यांना निवडून आणण्यासाठी मदत करतील असे देखील बोलले जाते. कारण कन्नडमध्ये संजना यांना मदत केली तर दानवे सत्तारांना त्यांच्या मतदारसंघात मदत करतील हे ठरलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कुठलेही मोठे पद नसतांना नितीन पाटील, संजना जाधव यांना व्यासपीठावर मानाचे स्थान देण्यात आले होते. त्यामुळे शिंदे गटाकडून या दोघांपैकी एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्यावेळी सत्तार काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in