कैलास पाटील मुख्यमंत्र्यांना बोलले अन् त्यांनी सचिवांना दालनात बोलावत थेट आदेशच दिला..

कैलास पाटील यांनी पुढाकार घेत दोन्ही विभागाच्या सचिवांच्या या करारावर स्वाक्षऱ्या मिळविण्यात यश मिळविले आहे.
Uddhav Thackeray, Kailas Patil
Uddhav Thackeray, Kailas PatilSarkarnama

उस्मानाबाद : सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग (Department of Public Health and Medical Education) यांच्यामध्ये सामंजस्य करारास अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मध्यस्थीने मंजुरी मिळाली आहे. करारास मंजुरी मिळण्यासाठी वेळ लागत असल्याचे दिसत असल्याने आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी थेट मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कानावर ही बाब घातली. त्यानी तातडीने दोन्ही सचिवांना आपल्या दालनात बोलावुन घेतले आणि त्याला मंजुरी देण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यानी सांगितल्यानंतर तातडीने यंत्रणा कामाला लागली असून त्याचदिवशी करारावर स्वाक्षऱ्या देखील झाल्या आहे.

Uddhav Thackeray, Kailas Patil
मिटकरींच्या 'त्या' वक्तव्यावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

उस्माणाबाद जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय म्हणुन वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाहिले जात आहे, त्यात आता या महाविद्यालयात प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रिया राबविणार असल्याने महत्वाच्या बाबी पुर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आमदार पाटील यांनी राजकीय शक्ती पणाला लावल्याचे दिसुन येत आहे. सत्ताधारी आमदार त्यातही पक्षाचे मुख्यमंत्री असल्याने त्यांना यामध्ये आतापर्यंत चांगलेच यश मिळाल्याचे दिसुन आले आहे. वैद्यकीय महाविद्यालय सध्या सूरु करायचे झाल्यास ते आरोग्य विभागाच्या जिल्हा रुग्णालयामध्ये करावे लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही विभागाचा करार होणे महत्वाचे आहे, पुढील तीन वर्ष जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसह काही जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत होणार आहेत. दिलेल्या कालावधीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी इमारतीसह आवश्यक सर्व बाबी निर्माण करायच्या आहेत. ते निर्माण झाल्यानंतर ही यंत्रणा जिल्हा रुग्णालयाकडे हस्तांतरीत होणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा या विभागामध्ये सामंजस्य करार होणे आवश्यक होते. दोन्ही विभाग शासनाचेच असले तरी त्यात अनेक तांत्रीक अडचणीचा विचार करता या करारास मंजुरी मिळण्यासाठी काही प्रमाणात अडचणी झाल्या होत्या.

Uddhav Thackeray, Kailas Patil
राणा दांपत्याला सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसैनिकांचा इशारा

अगोदरच वेळ कमी व त्यातच हा विषय प्रलंबित राहत असल्याचे पाहुन पाटलांनी पुढाकार घेत दोन्ही विभागाच्या सचिवांच्या या करारावर स्वाक्षऱ्या मिळविण्यात यश मिळविले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यंदाच्या वर्षी प्रवेश होण्याचा महत्वाचा टप्पा आता मार्गी लागला आहे. एप्रिलच्या अखेरीस एनएमसी (राष्ट्रीय आर्येविज्ञान आयोग) कडे प्रस्ताव दिल्यानंतर त्यांची टिम या ठिकाणी येऊन सर्व पाहणी करणार आहे. साधारम मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ही टिम यावी याचे नियोजन सध्या वैद्यकीय शिक्षण विभाग करताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com