वातावरण तापलं! कैलास पाटलांच्या आंदोलनाला हिंसक वळण...

Osmanabad Farmers Politics| २०२० च्या पीक विम्याची ५३१ कोटी रुपये जिल्ह्यातील तीन लाख ५७ हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावी, यासह अनेक मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
Usamanabad Farmers Politics|
Usamanabad Farmers Politics|

Osmanabad Farmers Politics| उस्मानाबाद :  उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात या करीता शिवसेना (Shivsena) जिल्हाप्रमुख आणि आमदार कैलास पाटील यांचे उपोषण सोमवार (ता.२४) पासून चालू आहे. पण हे आंदोलन चिघळल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी (२८ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर काही कार्यकर्ते चढून बसले होते. तर जिल्हाधिकारी कार्यालय कुलूप बंद देखील करण्यात आले होते. आज पुन्हा तेरणा कॉलेज येथे टायर जाळून रस्ता अडवण्यात आला. या आंदोलनाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याची माहिती आहे.

Usamanabad Farmers Politics|
Thackeray- Shinde Politics : 'जगात जे काही घडतयं, ते सरकार आल्यामुळेच'

२०२० च्या पीक विम्याची ५३१ कोटी रुपये जिल्ह्यातील तीन लाख ५७ हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावी, ५३१ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करताना शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र आणि नुकसान भरपाईचा विमा रक्कमेत कोणतीही छुपी कपात करु नये. २०२१ च्या पीकविम्याची उर्वरित ५० टक्के म्हणजेच ३८८ कोटी रुपयांची रक्कम विमा पात्र सहा लाख ६७ हजार २८७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावे. अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

त्यासोबतच, सप्टेंबर २०२२ मधील सततचा पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी, रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी २४८ कोटी रुपये जिल्ह्यातील दोन लाख ४८ हजार ८०१ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे आजपर्यंतचे विमा व अतिवृष्टीचे एक हजार दोनशे कोटी रुपये तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, या उपोषणातील मागण्यांवर ठोस कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार न घेण्यावर आमदार कैलास पाटील ठाम असल्याचेही खासदार  ओमराजे  राजेनिंबाळकर यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com