कैलास पाटील म्हणाले, तोपर्यंत उपोषण थांबवणार नाही..

Osmanabad Politics| Kailas Patil|आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे.
Kailas Patil  |
Kailas Patil |

Kailas Patil Agitation : माझ्या उपोषणामुळं जर शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळणार असतील तर मी हे उपोषण सुरुच ठेवणार, शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यानंतरच मी उपोषण थांबवेल, अशा शब्दांत उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी राज्य सरकारने आश्वासन देऊनही आपण उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले आहे.

आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उस्मानाबादचे शिवसेना (Shivsena) जिल्हाप्रमुख कैलास पाटील (Kailas Patil) मागील सहा दिवसापासून आ. पाटील हे आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमा कंपन्यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे पैसे लवकरात लवकर देऊ, असे आश्वासन दिले. मात्र, जोपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

Kailas Patil  |
Kailas Patil यांच्या आंदोलनाचा विमा कंपनीला दणका; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले जप्तीचे आदेश

विमा कंपनी व सरकारकडून सर्व शेतकऱ्यांना हक्काचे 1 हजार 200 कोटी रुपये येणे बाकी आहे. दसरा गेला, दिवाळीही गेली. पण सरकारला काही पाझर फुटला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. जून महिन्यापासून ऑक्टोंबर पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील 42 शेतकऱ्यांन मदत न मिळाल्यामुळे आपला जीव दिला. त्यांच्या कुटुंबावर काय दुःख बेतले असेल, त्यांच्या जाण्याने किती वेदना त्यांच्या कुटुंबाला झाल्या असतील. त्यांच्या या वेदनांपुढे माझी शारीरिक वेदना काहीच नाही. मानसिक वेदना मांडण्यासाठी मात्र माझ्याकडे आज शब्द नाहीत, अशा भावनाही त्यांनी असे पाटील म्हणाले.

पण हा लढा आता तुम्हा सर्वांसाठी आहे. तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिले, तीच माझी ऊर्जा आहे. असेच प्रेम कायम राहु द्या. आपण लढू, हक्क मिळवू, फक्त कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका, अशी माझी शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे, असे आवाहनही पाटील यांनी केलं आहे.

प्रशासकीय कारवाईत दिरंगाई होत असल्याचा आरोप करत पैसे मिळाल्यानंतर आपण उपोषण मागे घेणार, असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितलं आहे. इतकचं नव्हे तर काल एका दिवसात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असला तरी त्यांच्या शब्दांवर आपल्याला विश्वास नाही, असे नाही पण प्रशासकीय कारवाईत दिरंगाई होत असल्याचे कैलास पाटील यांनी म्हटले आहे.13 ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवला होता. तो काल विभागीय आयुक्तांनी पाठवण्यात आला. कामात अशा प्रकारची दिरंगाई होत आहे. पण माझ्यामुळे जर शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळणार असतील, तर आपण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचं कैलास पाटील यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com