डबक्यात उड्या मारुन, फोटो काढून कामे होत नसतात

अत्यंत कमी उत्पन्न असणाऱ्या बीड नगरपालिकेला वीज बिलाचा खर्च होऊ नये यासाठी या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. (Shivsena Leader Jaydatta Kshirsagar)
Sandeep Kshirsagar-Jaydatta Kshirsagar
Sandeep Kshirsagar-Jaydatta KshirsagarSarkarnama

बीड : विकास कामांसाठी प्रयत्न करावे लागतात. विकासकामे कोणी केली हे झाकून राहणार नाही, जनतेने डोळसपणे याकडे पाहिले पाहिजे, (Shivsena)असे आवाहन करत डबक्यात उड्या मारून किंवा फोटो काढून कामे होत नसतात, कोंबडे अरवले नाही म्हणून दिवस उगवणे थांबत नसतो, असा टोला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांनी पुतणे आमदार संदीप क्षीरसागर (Mla Sandeep Kshirsagar) यांना नाव न घेता लगावला.

जिथे तिथे टोलवसुली चालू असल्यामुळे चांगले अधिकारी सुद्धा बीडमध्ये काम करायला तयार नसल्याचा चिमटाही त्यांनी काढला. परिसरातील ईट येथील पाणी फिल्टर प्लांटवर माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या पुढाकाराने निमंत्रीतांसाठी आयोजित पाणी परिषदेत जयदत्त क्षीरसागर बोलत हेाते.

जयदत्त क्षीरसागर म्हणाले, टंचाईच्या काळात लोकांना पाण्याचे महत्व कळते. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता गरज भागवण्याकरता नगरपालिका प्रयत्न करते आहे. २००५ मध्ये नियोजन करून माजलगाव ते इट आणि इट पासून बीडपर्यंत हे पाणी आणण्याची योजना आम्ही आखली आणि ती मंजूर करून घेतली. योजना सुरू झाल्यानंतरही पाण्याची कमतरता भासू लागल्यामुळे आम्ही पुन्हा अमृत योजनेसाठी प्रयत्न केला आणि ती योजना देखील मंजूर करून आणली.

त्यामुळेच आता बीडकरांना पाण्याची कमतरता भासणार नाही. आगामी २०५० सालचा विचार करुन ही योजना राबवण्यात येत आहे. अत्यंत कमी उत्पन्न असणाऱ्या बीड नगरपालिकेला वीज बिलाचा खर्च होऊ नये यासाठी या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.

माझ्याकडे जेव्हा एमएसआरडीसीचे खाते होते तेव्हाच सोलापूर धुळे या महामार्गाला मंजुरी करून घेतली. काम झाल्यामुळे दळणवळण वाढले,रस्ते चांगले झाले, बीडच्या नागरिकांना टोल बसू नये याचीही काळजी घेतल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी नमूद केले.

Sandeep Kshirsagar-Jaydatta Kshirsagar
पूर्वी बीडचा विकास कागदोपत्रीच व्हायचा; प्रत्यक्षात निधी खर्चच होत नव्हता..

मात्र आता टोल धाड निर्माण झाली आहे. जिथे तिथे टोल वसुली सुरू झाली आहे. काम करताना इतरांकडे लक्ष न देता केली, त्यामुळेच अनेक विकासाची कामे करू शकलो. मराठवाड्यासाठी वाया जाणारे पाणी खेचून आणणे यासाठी पाण्याकरता तंटे करण्याची गरज नाही, समृद्धी महामार्गाला जोडून बुलेट ट्रेन करण्याची मागणीही मार्गी लागत आहे.

बीडच्या तहसील कार्यालयाची मध्यवर्ती इमारत जुनी झाली ती पुन्हा नव्याने करावी यासाठी आग्रहाची मागणी केली आहे. या मागण्या पाठपुरावा करून मंजूर करून घेऊ, असा विश्वासही क्षीरसागरांनी उपस्थितांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com