Ashok Chavan News : न्यायमुर्ती स्वतःला सुरक्षित समजत नाहीत, लोकांनी न्याय मागायला कुठे जायचे?

Congress : काँग्रेसने ७० वर्ष लोकशाहीच्या सर्व स्तंभांना स्वायत्त ठेवले.
Ashok Chavan News, Maharashtra
Ashok Chavan News, MaharashtraSarkarnama

Maharashtra : रायपूर येथे सुरू असलेल्या काॅंग्रेस अधिवेशनात माजीमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. देशात काॅंग्रेसने ७० वर्ष लोकशाहीच्या सर्व स्तभांची स्वायत्ता अबाधित ठेवली. पण गेल्या काही काळापासून ती कुमकूवत झाली असल्याचे ते म्हणाले.

Ashok Chavan News, Maharashtra
Devendra Fadanvis News : आम्ही अर्धवट काहीच करत नसतो, फडणवीसांचे दानवेंच्या ट्विटला प्रत्युत्तर..

अशोक चव्हाण यांनी देशातील परिस्थितीचे वर्णन करतांना सांगितले की, खासदार राहुलजी गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून द्वेषाच्या वातावरणाविरोधात संदेश दिला. (Congress) त्यांच्या या भूमिकेला प्रचंड समर्थन लाभले. केवळ काँग्रेसच नव्हे तर इतर राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातील तत्वानुसार काँग्रेसने ७० वर्ष लोकशाहीच्या सर्व स्तंभांना स्वायत्त ठेवले. पण मागील काही काळापासून त्यांना कमकुवत केले जाते आहे. आयुर्विमा महामंडळ, स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि शेयर मार्केटमध्ये देशातील नागरिकांनी गुंतवलेले कोट्यवधी रूपये बुडतात. पण त्याची साधी चौकशी होत नाही, हे चिंताजनक आहे.

देशाची सुरक्षा, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे अधिकार, सौहार्दावरील संकट, महागाई, बेरोजगारी आदी महत्त्वाच्या मुद्यांवर संसदेत चर्चा होऊ दिली जात नाही. वास्तव सांगणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना रोखले जाते. त्यांची वक्तव्ये कामकाजातून काढली जातात.

सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात केंद्र सरकारचा हस्तक्षेप वाढला. न्यायमुर्ती सुद्धा स्वतःला सुरक्षित समजत नाहीत. न्यायालये ही शेवटची आशा असते. तिथेही न्याय मिळणार नसेल तर लोकांनी जायचे तरी कुठे? असा सवाल देखील अशोक चव्हाण यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com