Hindu Jan Garjana March News : `जो हिंदू हित की बात करेगा`, सहकार मंत्र्यांच्या मोर्चात घोषणा..

Shivsena : मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वतः पोलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता रस्त्यावर उतरले होते.
Hindu Jan Garjana March News
Hindu Jan Garjana March NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ सकल हिंदु एकत्रिकरण समितीच्या वतीने आज हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतांना देखील या मोर्चासाठी हजारोंच्या संख्येने तरुण, महिला उपस्थित होत्या. राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, (Atul Save) जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल यांची देखील मोर्चाला उपस्थिती होती.

Hindu Jan Garjana March News
Chandrakant Khaire News : आम्ही २८ वर्ष शांत ठेवलेले शहर एमआयएम-भाजप पुन्हा पेटवू पाहत आहेत..

विशेष म्हणजे सहकार मंत्री अतुल सावे यांनी मोर्चात ` जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा` `सियावर रामचंद्र की जय` अशा घोषणा दिल्या. नामांतराच्याविरोधात (Aimim) एमआयएमने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चौदा दिवसांचे साखळी उपोषण केल्यानंतर (Marathwada) हिंदुत्ववादी संघटनांकडून देखील नामांतराच्या समर्थनात रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला होता.

१६ मार्च रोजी मनसेने संस्थान गणपती येथून स्वप्नपुर्ती रॅली काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलीसांनी हा मोर्चा रोखत मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून गुन्हे दाखल केले होते. काल नुमैदा कौन्सिलच्या वतीने मोर्चा काढून नामांतराच्या विरोधात विभागीय आयुक्त कार्यालयात निवदेन देण्यात आले होते. यामोर्चाला देखील मोठी गर्दी झाली होती.

सकल हिंदू एकत्रिकरण समितीने तापडिया नाट्यमंदिरात झालेल्या मेळाव्यातच छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक संघटना या समितीशी जोडल्या गेल्या आणि १९ मार्च रोजी हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्याचे निश्चित झाले होते. पोलिसांना परवानगी मागितली परंतु ती नाकारण्यात आली. त्यानंतरही मोर्चा काढण्यावर आयोजक ठाम होते.

त्यानूसार आज सकाळी दहावाजेपासूनच क्रांतीचौकात तरुणांचा गर्दी जमायला सुरूवात झाली होती. भगवे झेंडे, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असलेले फलक घेवून तरुण, महिला मोठ्या संख्येने क्रांतीचौका जमल्या होत्या. हा मोर्चा क्रातीचौक, पैठणगेट मार्गे जाणार होता. परंतु पोलिसांनी तो बदलून क्रांतीचौकातून सतीश मोटार्स, विवेकानंद महाविद्यालय, निराला बाजार मार्गे, फुले चौक, संभाजीपेठ असा वळवला. मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वतः पोलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता रस्त्यावर उतरले होते.

Hindu Jan Garjana March News
Sambhaji Patil Nilangekar News : शेतकऱ्यांनो तुम्ही खचू नका, केंद्रात अन् राज्यात आमचे सरकार...

साडेअकरा वाजता निघालेला मोर्चा फुले चौकात दुपारी दीड वाजता पोहचला. तिथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले आणि समारोप करण्यात आला. आजच्या मोर्चामुळे शहरात तणावाचे वातावरण होते, मात्र आयोजक आणि पोलिसांनी परस्पर सहकार्यातून हा तणाव दूर केला. मोर्चात छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्ती, तसेच श्रीरामाचे कटआऊट आण्यात आले होते. एका जीपमधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशे आणि घोषणाबाजीने मोर्चा मार्गावरील परिसर दणाणून गेला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com