जितेश अंतापूरकर यांच्याकडे सव्वा कोटींची वडिलोपार्जित संपत्ती, पण ५८ लाखांचे कर्जही

(Deglur-Biloli by Election) भाजपला पंढरपूरची पुनरावृत्ती होण्याचा विश्वास, तर जितेश यांना सहानुभूती आणि मतदारसंघात रावसाहेब अंतापूरकर यांनी केलेल्या विकासकामांची पावती मिळण्याची खात्री आहे.
Jitesh Antapurkar-Subhash Sabne
Jitesh Antapurkar-Subhash SabneSarkarnama

औरंगाबाद ः देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत महाविका आघाडीचे जितेश अंतापूरकर विरुद्ध भाजपचे सुभाष साबणे यांच्यात थेट लढत होत आहे. कोट्याधीश विरुद्ध सामान्य असे देखील या लढतीकडे बघितले जाते. भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथ पत्रात आपल्या व पत्नीच्या नावे कोट्यावधींची संपत्ती दाखवली आहे.

यात शेती, प्लाॅट, बॅंके व इतर वित्तीय संस्थांमधील गुंतवणूकीचा समावेश आहे. तर या उलट महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापरूकर यांच्याकडे फक्त सव्वा कोटी रुपयांची वडिलोपार्जित संपत्ती असल्याचे शपथ पत्रात नमूद करण्यात आले आहे. हिंदू विभक्त कुटुंब पद्धतीनूसार दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या एकूण संपत्तीत जितेश यांचा २५ टक्के वाटा आहे.

त्याच प्रमाणे वित्तीय संस्था व खाजगी बॅंकांच्या एकूण ५६ लाखांच्या देणी देण्यात देखील जितेश यांचा २५ टक्के वाटा नमूद करण्यात आला आहे. रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन झाल्यानंतर देगलूर-बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीने अंतापूरकर यांचे पुत्र जितेश यांना उमेदवारी दिली, तर भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना पक्षात घेत त्यांना मैदानात उतरवले आहे.

नांदेडचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा या निमित्ताने पुन्हा एकदा पणाला लागली आहे. भाजपला पंढरपूरची पुनरावृत्ती देगलूरमध्ये होण्याचा विश्वास आहे. तर जितेश यांना सहानुभूती आणि मतदारसंघात रावसाहेब अंतापूरकर यांनी केलेल्या विकासकामांची पावती मतदार देतील याची खात्री महाविकास आघाडीला आहे.

या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले असून जितेश अंतापूरकर हे साबणेंच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या कुमकूवत समजले जात आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रानूसार जितेश यांच्याकडे १ लाख रुपये रोख असून १ लाख १६ हजार ५६५ रुपयांच्या बॅंकेत ठेवी आहेत. या शिवाय दिवंगत रावसाहेब अंतापूरकर यांच्या नावे बॅंकेत असलेल्या ५ लाख १६ हजार ६१२ रुपयांच्या ठेवती जितेश यांचा (२५ टक्के हिस्सा) १ लाख २९ हजार १५३ एवढा दाखवण्यात आला आहे.

टाटा सफारी जीचे मुल्य ८ लाख दर्शवण्यात आले आहे ही गाडी देखील जितेश यांच्या वडिलांच्याच नावे आहे. जितेश यांच्या नावे एकूण २ लाख १६ हजार ५६५ एवढी जंगम मालमत्ता, तर त्यांचे वडिल रावसाहेब अंतापूरकर यांच्या नावावर १३ लाख १६ हजार ६१२ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यात हिंदू विभक्त कुटुंब पद्धतीनूसार जितेश यांचा २५ टक्के हिस्सा ३ लाख २९ हजार १५३ एवढा दर्शवण्यात आला आहे.

Jitesh Antapurkar-Subhash Sabne
शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, पण...

खानापूर एमआयडीसीत ४४ लाख ५६ हजारांचा बांधीव प्लाॅट, काजूपाडा बोरिवली येथे २०० चौरस फुटाचे घर ज्याची किंमत २० लाख रुपये नमूद करण्यात आली आहे. विशालनगर देगलूर येथे प्लाॅट ६८३३ चौ.फुट ज्याचे बाजार मुल्य ५५ लाख आहे, यात देखील जितेश अंतापूरकर यांचा २५ टक्के वाटा दर्शवण्यात आला आहे. अशी एकूण १ कोटी १९ लाख ५६ हजार ८०० रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जितेश व त्यांचे वडिल दिवंगत रावसाहेब अंतापूरकर यांच्या नावे आहे.

यात जितेश यांचा २५ टक्के हिस्सा २९ लाख १९ हजार २०० रुपये आहे. तर बॅंका तसेत इतर खाजगी वित्तीय संस्थांची ५८ लाख २४ हजार ४०० रुपये एवढी देणी जितेश यांनी शपथपत्रात दाखवली आहेत. यात जितेश यांच्या नावे २५ टक्क्यांप्रमाणे १४ लाख ५६ हजार १०० रुपयांची देणी दाखवण्यात आली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com