Jayant Patil : पक्ष वाढवायचा असेल तर प्रत्येक कार्यकर्ता सामान्यापर्यंत गेला पाहिजे..

मागील काळात आपल्या या जिल्ह्याने पवार साहेबांना मोठ्या प्रमाणात ताकद दिली होती, याची आठवण देखील त्यांनी आवर्जून करुन दिली. (Jayant Patil, Ncp)
Ncp State President In Aurangabad Meeting News
Ncp State President In Aurangabad Meeting NewsSarkarnama

औरंगाबाद : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते (Aurangabad)औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत आहेत. आपल्याला (Ncp) राष्ट्रवादी पक्ष वाढवायचा असेल तर प्रत्येक कार्यकर्ता सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचला पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

राष्ट्रवादी भवनात झालेल्या या आढावा बैठकीला जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या प्रमाणात हजर होते. (Marathwada) राज्यातील सत्तांतरानंतर राष्ट्रवादी पक्षाने नव्याने संघटना बांधणी व आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे सगळे वरिष्ठ नेते शिंदे-फडणवीस सरकारवर तुटून पडलेले असतांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्ष अधिक बळकट करण्यासाठी राज्याचा दौरा करत आहेत.

आज औरंगाबादेत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पाटील म्हणाले, आपल्याला आपला पक्ष वाढवायचा असेल तर पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळागाळातील सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचले पाहिजे. तसेच शहरातील वॉर्डा वॉर्डात बुथ लावून सभासद नोंदणी अभियान राबवणे आवश्यक आहे. मागील काळात आपल्या या जिल्ह्याने पवार साहेबांना मोठ्या प्रमाणात ताकद दिली होती, याची आठवण देखील त्यांनी आवर्जून करुन दिली.

Ncp State President In Aurangabad Meeting News
Grampanchyat Election : परभणी जिल्ह्यात ना भाजप, ना शिंदेसेना ; काॅंग्रेस-राष्ट्रवादीची बाजी..

आगामी जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका पाहता राष्ट्रवादीला या जिल्ह्यात चांगले यश मिळवायचे असेल तर प्रत्येकाने मेहनत घेणे आवश्यक असल्याचेही पाटील म्हणाले. यावेळी खासदार फौजिया खान, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, आमदार राजेश टोपे, विक्रम काळे, सतिश चव्हाण, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, निरीक्षक अमरसिंह पंडित, माजी आमदार प्रा. किशोर पाटील, भाऊसाहेब चिकटगावकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, वक्ता सेल प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळंके आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com