Aurangabad Teachers Constituency : राणा पाटलांची यशस्वी शिष्टाई : क्षीरसागरांची ताकद भाजपच्या किरण पाटलांच्या पाठीशी

भाजपचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री बीडमध्ये छोटेखानी बैठक झाली.
Jayadatta Kshirsagar-Kiran Patil-Rana Jagjit Singh Patil
Jayadatta Kshirsagar-Kiran Patil-Rana Jagjit Singh PatilSarkarnama

बीड : औरंगाबाद (Aurangabad ) विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणुक अटीतटीची होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार आमदार विक्रम काळे (Vikram Kale) आणि भाजपचे (BJP) उमेदवार प्रा. किरण पाटील (Kiran Patil) या दोघांकडूनही निवडणुकीत ताकद लावली जात आहे. शेवटच्या टप्प्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांचे बळ भाजप उमेदवार प्रा. किरण पाटील यांच्या पारड्यात पडले आहे. (Jayadatta Kshirsagar's Support to BJP candidate Prof. Kiran Patil)

भाजपचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjit Singh Patil) यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री बीडमध्ये छोटेखानी बैठक झाली. माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व माजी प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांनी अधिकृत पाठींबा जाहीर केला. जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या आदर्श शिक्षण संस्था, नवगण शिक्षण संस्था, विनायक शिक्षण संस्था, अनंत कृषी प्रतिष्ठानच्या अनेक शाळा व महाविद्यालये आहेत.

Jayadatta Kshirsagar-Kiran Patil-Rana Jagjit Singh Patil
Vidarbha News : विदर्भात बावनकुळेंचा काँग्रेसला दे धक्का : गडचिरोलीतील वरिष्ठ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवर डॉ. प्रीतम मुंडे यांना पाठिंबा देत नंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सत्ता असतानाही क्षीरसागर सत्तेपासून अंतरावरच होते. तर, सत्तांतरानंतर शहरातील नगरोत्थानच्या रस्ते व नाल्याच्या कामाचे भूमिपूजन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले. त्यामुळे त्यांना शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निलंबित करण्यात आले आहे.

Jayadatta Kshirsagar-Kiran Patil-Rana Jagjit Singh Patil
Satyajeet Tambe Bjp Support News : तांबेंच्या पाठिंब्याबाबत विखे-पाटलांचे मोठे विधान; ‘तो निर्णय भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा’

दरम्यान, औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक रंगतदार अवस्थेत आहे. विक्रम काळे विद्यमान आमदार असून त्यांचे संघटन मजबूत आहे. तर, त्यांच्या विरोधात भाजपने प्रा. किरण पाटील यांना उतरवून आव्हान उभे केले आहे. मात्र, प्रचार काळात क्षीरसागरांची भूमिका काय, याकडे लक्ष लागले होते. शेवटच्या टप्प्यात त्यांनी आपले बळ प्रा. किरण पाटील यांच्या पारड्यात टाकले आहे.

Jayadatta Kshirsagar-Kiran Patil-Rana Jagjit Singh Patil
Santosh Bangar News : प्राचार्याला मारहाण करणे भोवले : आमदार संतोष बांगरांसह ४० जणांवर गुन्हा दाखल

भाजपचे निवडणूक प्रभारी राणा जगजितसिंह पाटील यांनी शनिवारी येथे भेट दिल्यानंतर त्यांची व माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, माजी नगराध्यक्षा प्राचार्य दीपा क्षीरसागर, विलास बडगे, जगदीश काळे, दिनकर कदम, मंत्री बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा आदींसोबत बैठक झाली. त्यात पाठिंबा घोषीत करण्यात आला. दरम्यान, भाजप उमेदवाराला पाठींबा दिल्याने क्षीरसागरांची भाजपसोबतची जवळीक आणखी स्पष्ट झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com