Jalna : सत्तार, भुमरे दोघेही माझ्या संपर्कात...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या समर्थनार्थ २८ रोजी जालन्यात खोतकरांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. ( Shivsena)
Khotkar-Sattar-Bhumre are both in touch with me News
Khotkar-Sattar-Bhumre are both in touch with me NewsSarkarnama

जालना : एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेतील बंडखोर मंत्री व आमदारांशी संपर्क सुरू आहे. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार हे दोघेही माझ्या संपर्कात असल्याचे माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले. (Shivsena) मी फक्त दोन दिवसच विरोधी पक्षात आहे, या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विधानावर महाविकास आघाडी सरकार राज्यात कायम राहील, असे म्हणत खोतकर यांनी प्रत्युत्तर दिले.

महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेचा एक मोठा गट फुटून बाहेर पडला आहे. (Jalna) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मंत्री, आमदार आणि अपक्ष असे पन्नासहून अधिकजण या बंडात सहभागी झाले आहेत. या बंडखोरांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू असतांनाच त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका देखील घेण्यात आली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे हे मेळाव्यातून बंडखोराचा समाचार घेत आहेत. तर दुसरीकडे काही नेते हे बंडखोरांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदारांचा या बंडात समावेश आहे. पैकी शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार हे दोघे आपल्या संपर्कात असल्याचा दावा अर्जून खोतकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या समर्थनार्थ २८ रोजी जालन्यात खोतकरांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठीच्या नियोजन बैठकीनंतर खोतकर यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले.

Khotkar-Sattar-Bhumre are both in touch with me News
Shivsena : सगळ्यात जास्त फंड, तरीही बंड ? छोटे ठाकरे भुमरेंवर संतापले..

खोतकर म्हणाले, राज्याबाहेर गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांशी अजूनही परत येण्यासाठी शिवसेनेकडून संपर्क सुरूच आहे. अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे माझ्या संपर्कात आहेत. राज्याबाहेर गेलेले आमदार परत येतील असा विश्वास मला असल्याचेही खोतकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in