केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना कोरोनाची लागण

लक्षण जाणवत असल्याने दानवे यांनी कोरोना टेस्ट केली होती. ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दानवे यांनी ट्विट तसेच फेसबूकवर शेअर केली आहे. ते सध्या डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना कोरोनाची लागण
Raosaheb Danvesarkarnama

जालना : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील शुक्रवारचा आकडा तर चिंता अधिक वाढवणारा आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 40 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 14 हजार 256 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात राज्यात 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील मंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय मंत्री देखील कोरोना बाधित होत असल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. रावसाहेब दानवे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. ते सध्या सायसोलेशनमध्ये आहेत.

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी साहेब लवकर बर व्हा, असं दानवेंना म्हटलयं. लक्षण जाणवत असल्याने दानवे यांनी कोरोमा टेस्ट केली होती. ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दानवे यांनी ट्विट तसेच फेसबूकवर शेअर केली आहे. ते सध्या डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत.

Raosaheb Danve
सोमय्यांना माझी माफी मागावीच लागेल!

तर दुसरीकडे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येताच त्यांनी पुन्हा एकदा आपल्या दौऱ्यांना सुरुवात केली आहे. कोरोनातून बरे होताच त्यांनी आपल्या मतदार संघामध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये थोरात यांनी तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सर्वाजनिक ठिकाणी गर्दी करू नका, आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडा. बाहेर पडताना मास्कचा वापर करा असे आवाहन थोरात यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in