Jalna Political : माझ्या जावयावरचे आरोप खोटे, गोरंट्याल यांचीच चौकशी करा..

Arjun Khotkar : कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्यांची बाजू घेणाऱ्या गोरंट्याल यांचीच चौकशी करा, अशी मागणी केली.
Arjun Khotkar-Kailas Gorantyal News, Jalna
Arjun Khotkar-Kailas Gorantyal News, JalnaSarkarnama

Arjun Khotkar : क्रिप्टोकरन्सी या अभासी चलणात जिल्ह्यातील शेकडो लोकांची फसवणूक झाली आहे. कोट्यावधींचा घोटाळा झाल्यामुळे अनेकजण नैराश्यात गेले आहेत. मी अशा लोकांच्या पाठीशी उभा राहिला, तर आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) हे घोटाळे करणाऱ्यांच्या बाजूने. त्यामुळे खरतरं त्यांची चौकशी झाली पाहिजे.

Arjun Khotkar-Kailas Gorantyal News, Jalna
Aurangabad Scam : तीस-तीस घोटाळा असा झाला..

माझ्या जावयावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी केला आहे. (Jalna) शिवाय ज्या लोकांचे कोट्यावधी रुपये क्रिप्टोकरन्सीमध्ये बुडाले, त्या सगळ्यांचे पैसे मिळवून द्या, अन्यथा तुमच्या घरावर मोर्चा आणू, असा इशारा देखील अर्जून खोतकर यांनी गोरंट्याल यांना दिला. (Marathwada) गोरंट्याल यांना माझ्या नावाचा कावीळ झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

जालन्यात क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारातून व्यावसायिक किरण खरात यांचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अर्जून खोतकर यांचे जावई क्रिकेटपटू विजय झोल याच्यासह त्याच्या भावावर व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी या प्रकरणात माजी मंत्री अर्जून खोतकर यांचाच हात असल्याचा आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती.

यावर खोतकरांनी पलटवार करत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्यांची बाजू घेणाऱ्या गोरंट्याल यांचीच चौकशी करा, अशी मागणी करत खोतकर यांनी आपल्या जावयावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. विजय झोल याच्याविरोधात जालन्यातील एका व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

झोल याने आपला भाऊ आणि मित्रांसोबत किरण खरात या व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली होती. पुणे येथे अपहरण करून खरात यांना औरंगाबाद येथील एका हाॅटेलात डांबून ठेवण्यात आले होते. तसेच जालना येथे खरात यांच्या घरी जावून संबंधितांनी बंदूकीचा धाक दाखवत राहते घर, फ्लाॅट्स व इतर मालमत्ता जबरदस्तीने झोल व त्यांच्या कुटुंबियांनी लिहून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या शिवाय विजय झोल याने आपले अंबड येथील सुखसागर हाॅटेल नावावर करून देण्यासाठी दबाव आणत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे देखील खरात यांनी म्हटले आहे. दरम्यान, जालन्याचे काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी या प्रकरणी अर्जून खोतकर हेच असल्याचा गंभीर आरोप केला. मात्र खोतकरांनी सगळे आरोप फेटाळून लावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com