Jalna Political News : खोतकरांचे जावई झोल याला अटकपुर्व जामीन मंजूर..

Marathwada : झोल, त्याचा भाऊ विक्रम आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Arjun Khotkar-Jalna Crime News
Arjun Khotkar-Jalna Crime NewsSarkarnama

Marathwada : शिंदे गटाचे नेते माजी मंत्री अर्जून खोतकर यांचे जावई विजय झोल (Vijay Zhoal) याच्याविरोधात जालन्यातील एका व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात झोल यांना सत्र न्यायालयाने अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे. झोल याने आपला भाऊ आणि मित्रांसोबत किरण खरात या व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली होती.

Arjun Khotkar-Jalna Crime News
Imtiaz Jalil News : शेलारांनी ट्विट केला हिंदू मोर्चाचा फोटो, इम्तियाज म्हणाले हे तर मोठे कारस्थान..

पुणे येथे अपहरण करून खरात यांना औरंगाबाद येथील एका हाॅटेलात डांबून ठेवण्यात आले होते. तसेच जालना (Jalna) येथे खरात यांच्या घरी जावून संबंधितांनी बंदूकीचा धाक दाखवत राहते घर, फ्लाॅट्स व इतर मालमत्ता जबरदस्तीने झोल व त्यांच्या कुटुंबियांनी लिहून घेतल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. (Marathwada)

या प्रकरणी झोल, त्याचा भाऊ विक्रम आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात खोतकरांचे जावई विजय झोल याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. सोबतचबंधू विक्रम झोल यालाही अटकपूर्व जामीन मंजुर करण्यात आला आहे.

व्यक्तीगत जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणात विजय झोल त्याचा भाऊ विक्रम झोल यांच्यासह १५ जणांच्या विरोधात तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. दरम्यान, या प्रकरणावरून खोतकर यांचे कट्टर विरोधत काॅंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी गंभीर आरोप केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com